Devendra Fadanvis|आमच्यात हिंमत होती म्हणून..; फडवणीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Devendra Fadanvis| Uddhav Thackeray| दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे.
Devendra Fadanvis|
Devendra Fadanvis|

मुंबई : “ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना कोण संरक्षण देते हे आपण पाहिले आहे. मंत्री बनवलेले त्यांचे (दहशतवादी) साथीदार आजही तुरुंगात बसले आहेत. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना दोषी ठरवले”, अशा सूचक शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. या याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण करून एका दहशतवाद्याच्या प्रतिमे संवर्धन केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, याकूब मेननच्या कबरीचं कोणत्याही प्रकारटं सुशोभिकरणाचं झालं नसल्याचं या कब्रिस्तानच्या ट्रस्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Devendra Fadanvis|
Jalgaon news| विसर्जन मिरवणूकीला गालबोल; महापौरांच्या घरावर हल्ला

भाजप नेते राम कदम यांनी याकूब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करुन त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदमांनी उपस्थित केला होता. पण त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मेननच्या कबरीवरील लाईट्स काढण्यात आले.

पण या सर्व वादावर कब्रिस्तानचे ट्रस्टी शोएब खातिब म्हणाले की “ याकूब मेननच्या कबरीचे सुशोभिकर करण्यात आलेले नाही. कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं. लाईट लावलेला व्हिडीओ शब-ए-बारातमधील ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. कोविडमुळे गेल्या तीन वर्षांत हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या र्वच कब्रिस्तानांमध्ये रोषणाई करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in