संजय राऊतांचेच आमदार हरामखोर होते...

Devendra Fadnavis|Devendra Bhuyar | Sanjay Raut : शिवसेनेचे बंडखोर आमदार किती दिवस राहतील हे पाहावे लागेल.
MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar Latest News
MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar Latest NewsSarkarnama

Devendra Bhuyar : राज्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. यावेळी शिरगणती करून मतदान झाले. सरकारच्यावतीने भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना 164 मतं पडली. तर विरोधकांचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना 107 मतं मिळाली. त्यामुळे नार्वेकर यांनी अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीवेळी अपक्ष आमदारांना चांगलाच भाव आला होता. त्यावेळी मतदान हे गुप्त पद्धतीने झाल्याने नेमके कुणी कोणाला मतदान केले हे समजले नव्हते मात्र, आज पार पडलेली निवडणूक शिरगणतीने झाल्याने कोणत्या आमदारांनी कुणाच्या बाजूने मतदान केले हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी आपले मत आज साळवी यांना केले. यानंतर भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना आमच्याबद्दल गैरसमज झाला होता. मी त्यांना त्यावेळी सांगितले होते की तुमचेच गद्दार आहेत. त्यांना कळायला हवे होते की, त्यांना आता समजले असेल की त्यांचेच आमदार हरामखोर होते, अश्या शब्दात त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. (MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar Latest News)

MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar Latest News
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तासाभरातच सुनील प्रभूंचा नार्वेकरांना सूचक इशारा

भुयार म्हणाले की, संजय राऊत साहेबांचा आमच्याबद्दल गैरसमज होता. मात्र, त्यांना कळायला हवे होते की त्यांचेच आमदार हरामखोर होते. त्यांना मी त्यावेळीही सांगितले होते की तुमचे काही आमदार गद्दार आहेत. मात्र त्यांनी आपल्यावर शंका घेतली होती,असे भुयार म्हणाले. तर शिवसेनेचे बंडखोर आमदार हे किती दिवस राहतील हे पाहावे लागेल. तसेच राज्यपाल कोश्यारी हा बोगस व्यक्ती आहे. त्यांनी आधी महाविकास आघाडीची सत्ता असतांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची परवानगी दिली नाही. आता मात्र बरोबर परवानगी दिली आणि निवडणुक घेतली आहे, अशा शब्दात भुयार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे.

MP Sanjay Raut and MLA Devendra Bhuyar Latest News
शरद पवारांकडून मला दोनदा राज्यसभेवर पाठविण्याची ऑफर होती : आढळरावांचा गौप्यस्फोट

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीला साथ दिली नसल्याचे संजय राउतांनी म्हटले होते. त्यानंतर भुयार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शदर पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर राऊतांना केलेल्या आरोपावर भुयार हे चांगला कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांच्याबाबतच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले होते. आता आज झालेल्या निवडणुकीत तर प्रत्यक्ष उभे राहून मतदान झाल्याने भुयार हे त्यावेळी सांगत होते ते खरे होते हे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com