
Deven Bharti news : राज्याच्या गृहविभागाने (Maharashtra Home Department) बुधवारी 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली आहे.
त्यांची विशेष आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड करणे गरजेचे आहे का, असा प्रश्न आता काँग्रेसने विचारला आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
देवेन भारती यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष आयुक्त पदाची निर्मिती राज्य सरकारने केली आहे. हे पद निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मुंबई पोलिस दलात हे पद नव्हते.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या नियुक्तीवरुन शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे."मुंबई पोलीस दलात आयुक्त हे सर्वोच्च पद असताना विशेष पोलिस आयुक्त नेमून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलिस दलात मोडतोड करून विशेष पोलिस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे. फडणवीस हे समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.
विशेष पोलिस आयुक्तपद मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहील, असे सरकारने स्पष्ट केले असले तरी देवेन भारती यांच्याकडे सहपोलिस आयुक्त यांच्या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दलात हे पद प्रभावी ठरणार असल्याचे सरकारचे मत आहे.
देवेन भारती हे याआधी मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र एटीएसचेही नेतृत्व केले आहे.
विशेष पोलीस आयुक्तपद काय आहे. ?
आतापर्यंत महासंचालक पदाच्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त पदासाठी नेमणूक केली जायची.
महाविकास आघाडी सरकार जाताच नव्या सरकारने या पदाची निर्मिती केली आहे.
आता सरकारने या नव्या पदाची निर्मिती केली असून त्याजागी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर मुंबईतही अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच देवेन भारती काम पाहणार आहेत.
देवेन भारती यांच्याकडे गुन्हे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची जबाबदारी असणार आहे.
भारती यांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाच अहवाल द्यावा लागणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.