जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण! फडणवीसांनी घेतली नार्वेकरांनी फिरकी

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Rahul Narvekar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News
Rahul Narvekar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमतानं निवड झाली आहे. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांकडून सभागृहात त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. नार्वेकर हे विधानसभेचे देशातील सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच त्यांनी नार्वेकरांची फिरकीही घेतली. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

नार्वेकर (Rahul Narvekar) हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे जावई आहेत. त्यामुळे आता वरिष्ठ सभागृहात सासरे आणि विधानसभेचे अध्यक्ष जावई असं पहिल्यांदाच घडलं आहे. फडणवीस यांनाही त्यावर बोलण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे यांचा उल्लेख करत फिरकी घेतली.

Rahul Narvekar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News
शिरगणती झाली अन् अखेर ठाकूरांचं नेमकं मत कुणाला हे उघड!

फडणवीस म्हणाले, आज हाही योगायोगही असेल की, वरच्या सभागृहातील सभापती आणि यांचं नातं सासरं आणि जावयाचं आहे. पु. ल. देशपांडे असं म्हणतात की, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण. जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे, असं पुलं म्हणतात, असं सांगत फडणवीसांनी नार्वेकरांची फिरकी घेतली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरूण आहेतच पण देशाच्या इतिहासातीलही तरूण अध्यक्ष आहेत. या सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला विशेष महत्व आहे. हे कायदेमंडळ आहे. गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो किंवा कुठल्यातरी कर्नाटकच्या सीमेवरील माणूस असो. प्रत्येेकाचा विचार, आशा-आकांक्षा या सभागृहात प्रतिध्वनित होतात. आणि छोट्यातले छोटे प्रश्न सोडवण्याची क्षमता य सभागृहात आहे. त्यामुळे या सभागृहाचे अध्यक्ष होणं, हा भाग्याचा योग आहे, असं फडणवीस म्हणाले.

Rahul Narvekar Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News
शहाजीबापूंनी विधानभवनात रुबाबात एन्ट्री केली अन् तो नारा घुमला!

सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. सर्वांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागते. हे कठीण काम असते. कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक खरी आणि एक खोटी. पण इथे यांची, त्यांची, आमची भूमिका असते. पण इथे तिसरी बाजू असते ती खऱ्याची बाजू. यानुसार निर्णय घ्यावे लागतात, असं फडणवीसांनी नमूद केलं.

कायद्यामध्ये निश्चितपणे काय आहे हे समजून घेऊन न्यायालयाच्या कसोटीवर आपला कायदा टिकला पाहिजे, त्यासाठी आपण चपखलपणे निरीक्षणे मांडत होता. हे पाहिले आहे. त्यामुळे कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष मिळाले आहेत. एक अतिशय योग्य व्यक्ती याठिकाणी बसला आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी नार्वेकरांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com