मुंडेंच्या भेटीसाठी अजितदादा ब्रीच कँडीत पोचले अन् म्हणाले, काळजीचं कारण नाही!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dhananjay Munde and Ajit Pawar
Dhananjay Munde and Ajit PawarSarkarnama

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी मुंडेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Dhananjay Munde News Updates)

मुंडे यांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सगळ्यांना आश्वस्त केलं. ते म्हणाले की, काळजीचं कोणतंही कारण आहे. धनंजय मुंडे यांना आज संध्याकाळपर्यंत अतिदक्षता विभागातून बाहेर हलवतील. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. त्यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Dhananjay Munde and Ajit Pawar
केजरीवालांनी डावलताच मुख्यमंत्री तातडीनं मंत्रिमंडळ बैठक बोलावून घेणार मोठा निर्णय

मुंडे यांना काल सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी रुग्णालयाच्या वतीने दिली. दरम्यान, मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते रुग्णालयात पोचत आहेत. मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

Dhananjay Munde and Ajit Pawar
केजरीवालांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत!

धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. या सारख्या खोट्या बातम्या पसरणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीही मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com