Ajit Pawar: मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत अजितदादा संतापले

पुण्याच्या नामांतरचा मुद्दा तसेच ऊर्जा विभागाचे काही हजार कोटींच्या प्रस्तावावरून पवारांनी नाराजी व्यक्त केली.
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळाची बुधवारी शेवटची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. पण त्याआधी काही महत्वाचे निर्णयही घेण्यात आले. त्यामुळे ही बैठक तशी ऐतिहासिक ठरली. याच बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. (AJit Pawar Latest Marathi News)

बैठकीतमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपल्या विभागाच्या फाईल्स अजित पवार यांनी रोखल्याची नाराजी व्यक्त व्यक्त केली. त्यावर पवारांनी लगेच उत्तर दिलं. प्रत्येक फाईल 20 ते 25 हजार कोटींची असेल तर मंजूर कशी करणार, असा सवाल पवारांनी केला. तसेच एवढ्या मोठ्या तरतुदींवर चर्चा झाल्याशिवाय फाईल मंजूर करायच्या का, असंही पवार म्हणाले.

Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; अडीच वर्षांनंतर 'मविआ' सरकार पायउतार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. पुण्याचे नामांतर जिजाऊनगर करण्याचाही प्रस्ताव बैठकीत आला होता. यावरूनही अजित पवार संतापल्याचे समजते.

ही सहकारी संस्थांची बैठक नसल्याचे पवार म्हणाले. पुण्याच्या नामांतराचा मुद्दा काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी उपस्थित केला. त्यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. जिजाऊनगर असं नामांतर करण्याला आमचा विरोध नाही. पण आम्हाला पुण्याच्या मंत्र्यांना विचारून तरी प्रस्ताव आणा, अशी भावना पवारांनी यावेळी व्यक्त केली.

Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
"मला खेळ खेळायचा नाही" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांचे आभार मानले. याचवेळी ते राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच शेवटच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला शिवसेनेचे फक्त चारच मंत्री होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेवटच्या भाषणातही उल्लेख केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com