Ajit Pawar : अजितदादांचा 'तो' हट्ट पुरवून फडणवीस 2019 ची परतफेड करणार?

अजित पवार यांनी देवगिरी बंगल्याची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.
Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news
Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता राज्याचा गाडा हाकण्यास सुरूवात केली आहे. पण 20 दिवसांनंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटपही झालेली नाही. तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्र्यांना देण्यात आलेले बंगले त्यांना सोडावे लागणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार त्याला अपवाद ठरणार आहेत. (Ajit Pawar Latest Marathi News)

अजित पवार हे सध्या राहत असलेला देवगिरी बंगला सोडण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागील अडीच वर्षांपासून पवार याच बंगल्यात राहत आहेत. 2014 मध्ये भाजपची सत्ता आली त्यावेळी सुधीर मनुगंटीवार यांना हा बंगला मिळाला होता. त्यानंतर 2019 मध्ये पवार या बंगल्यात राहायला आले. तसेच 1999 ते 2014 मध्येही ते याच बंगल्यात राहत होते.

Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news
NCP : मोठी बातमी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील विभाग, सेल बरखास्त

आता हा बंगला आपल्याकडे राहावा, यासाठी अजितदादांची धावपळ सुरू असल्याचे समजते. त्यांनी तशी मागणी सामान्य प्रशासन विभागाकडेही केली आहे. याच विभागाकडून बंगल्यांचे वाटप केले जाते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही पवारांनी साकडं घातल्याचे समजते. पण राष्ट्रवादीकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.

Ajit Pawar News in Marathi, Devendra Fadnavis news, Maharashtra Session news, Floor test news
Shiv Sena : शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार; आता थेट बिर्लांना देणार आव्हान

फडणवीस हे 2019 मध्ये विरोधी पक्षनेता बनल्यानंतर त्यांना राहण्यासाठी सागर बंगला देण्यात आला होता. सध्या ते तिथेच राहत आहेत. हा बंगला सुरूवातीला मंत्र्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. पण त्यावेळी फडणवीस यांनी हाच बंगला आवर्जून मागितला होता. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली होती. आता अजित पवारही देवगिरीसाठी आग्रह धरत असल्याने फडणवीस त्यांचा हट्ट पुरवणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in