चूक करणाऱ्याला निलंबित करा! अजितदादांनी मनिषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापलं!

कोणत्याही कामात चूक आढळून आली की उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना ती चूक लक्षात आणून देतात.
Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News
Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : कोणत्याही कामात चूक आढळून आली की उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना ती चूक लक्षात आणून देतात. असे प्रसंग अनेकदा घडतात. पण रविवारी त्यांनी थेट प्रधान सचिवांसह इतर अधिकाऱ्यांना सुनावलं. कार्यक्रमाच्या नियोजनात झालेल्या चुका त्यांनी आपल्या भाषणात दाखवून दिल्या. (Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मुंबईत राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत 'माझी वसुंधरा 2 पुरस्कारांचे' वितरण करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणात विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर (Manisha Mhaiskar) यांना सुनावलं. व्यासपीठावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही (Aditya Thackeray) उपस्थित होते.

Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News
केतकी चितळे प्रकरण आता राज्यपाल दरबारी; सीबीआयची एन्ट्री होणार?

पर्यावरणविषय चांगली कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका तसेच इतर विभागांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये बहुतेक पुरस्कारांचा स्वीकार करण्यासाठी अधिकाऱ्यांनांच निमंत्रित करण्यात आले होते. त्यावरून पवारांनी खडे बोल सुनावले.

अनेक लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष, महापौर म्हणून काम करत होते. मुदत संपल्यामुळे अधिकारी प्रशासक म्हणून आले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनाही बोलवायला हवे होते. तिथं लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीचाही खूप मोठा वाटा होता. त्यांनाही बोलावलं असतं तर बरं वाटलं असतं. काहीतरी कुठतरी गंमत झालेली आहे. ती पुढच्यावेळी होऊ नये, असं पवार म्हणाले.

लोकांनाही तेवढाच मान मिळाला पाहिजे. अधिकाऱ्यांना कमी मिळाला तरी चालेल. ही लोकशाही आहे, बाकीचं काही चालणार नाही. मी कुणाचा अपमान करत नाही, पण याची नोंद घेतली पाहिजे. मी बरोबरच बोलतो. महाराष्ट्राला माझं थोडं कठीण वाटतं पण बरोबर असतं, अशा शब्दांत पवारांनी सुनावलं.

Deputy CM Ajit Pawar Latest Marathi News
काँग्रेसला धक्का दिलेल्या सिब्बलांसह 41 जण बिनविरोध; महाराष्ट्रात राजकारण तापलं

मनिषा म्हैसकर यांनाही सुनावलं

पुरस्कारार्थींना दिलेल्या काही प्रमाणपत्रांवर कोल्हापूर जिल्हा नमूद केले होते. पण प्रत्यक्षात ते वेगळ्या जिल्ह्यातील पुरस्कार होते. या प्रमाणपत्रांवर मनिषा म्हैसकर यांच्यासह आदित्य ठाकरे यांचीही सही होती. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, असं चालणार नाही. मनिषा म्हैसकर यांनी सही केली म्हणून आदित्य यांनी केली. ज्यावेळी अजित पवार तुम्हाला 100 कोटी देतो, तेव्हा घरचा निधी देत नाही. सरकारचा, जनतेचा पैसा आहे. त्यामुळे त्याचे वाटपही नीट व्हायला हवे.

कार्यक्रम चोखपणे झाला पाहिजे. जे चुकले असतील त्यांना निलंबित करा. चुका करणार आणि मला दिडशे कोटी मागणार. मी काय इथं मोकळा बसलोय. हे बारकावे बघायला हवेत. मला चुक दिसली तर मी चुका काढणार. चांगलं दिसलं तर अभिनंदन करणार. दिडशे नव्हे दोनशे कोटी देतो पण चित्र बदलून टाका. सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करा. योग्य असेल त्याचं कौतुक करू, मोठ्या प्रमाणात पुरस्कार देऊ. पण चुक होऊ नये, असे खडेबोल पवार यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in