फडणवीस-ठाकरे भेटीनं सत्तानाट्यात ट्विस्ट येणार? आज दुपारी शिवतीर्थावर चर्चा

फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरेंकडून कौतुक...
Raj Thackeray Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi News
Raj Thackeray Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मागील महिनाभरापासून राज्याच्या राजकारणात अनेक अविश्वनीय घडामोडी घडत आहे. या काळात भाजप (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही (MNS) जवळीक वाढली. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी मनसेच्या एकमेव आमदाराने सरकारला मदत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं. तर फडणवीस यांनीही ठाकरेंना लवकरच भेटणार असल्याचे जाहीर केले होते. (Devendra Fadnavis Latest News)

फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता राज ठाकरे आणि फडणवीस यांची आज शिवतीर्थ या निवासस्थानी भेट होणार आहे. दुपारी दोन वाजता फडणवीस हे ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर येणार आहेत. या भेटीत राजकीय चर्चाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. (Devendra Fadnavis Will Meet Raj Thackeray)

Raj Thackeray Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi News
आमदार आवताडेंची सत्ता जाणार? 'दामाजी'च्या निवडणुकीत चुरशीनं मतदान

राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांना सक्तीची विश्रांती सांगितली आहे. पण त्यानंतरही ठाकरे सक्रीय झाले असून ते लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. आज होणार मेळावा पावसामुळे स्थगित करण्यात आला आहे. आगामी नगरपालिका व महापालिका निवडणुकांमध्येही मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

यापार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीबाबत उत्सुकता वाढली आहे. मनसे आणि भाजपची जवळीक पाहता हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पण अद्याप त्याला कुणीही ग्रीन सिग्नल दिलेला नाही. आजच्या भेटीत त्यादृष्टीने चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Raj Thackeray Latest News, Devendra Fadnavis Latest Marathi News
अश्विनी भिडे पुन्हा मेट्रोत येताच सुमीत राघवन झाला भलताच खूश!

राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता आली आहे. राज ठाकरे यांनीही त्याचं स्वागत केले आहे. त्यामुळे तेही भाजपच्यासोबत जाणार का, याबाबत उत्सुकता आहे. तसं झाल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान असेल. प्रामुख्याने शिवसेनेसाठी महत्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना जोरदार धक्का बसू शकतो, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com