
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कांद्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केलं. यानंतर सभागृहात कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधकांनी सरकारला घेरलं.
विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा मांडला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यास सुरवात केली.
शिंदे उत्तर देताना म्हणाले,''सभागृहाच्या भावना लक्षात आल्या. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. निकष डावलून भरपाई दिली आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे'', असं ते म्हणाले.
''तसेच नाफेडने खरेदी केली. ज्या ठिकाणी नाफेड सुरू नसेल त्या ठिकाणी सुरू केली जाईल. तसेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करेल'', असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
मात्र, या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले. विरोधक आक्रमक झाल्यामुळे मुख्यमंत्री बोलता-बोलता थांबले. मात्र, लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीला धावले.
यानंतर फडणवीस म्हणाले, ''मुख्यमंत्री अत्यंत जबाबदारीने बोलत आहेत. कांद्याची खरेदी सुरू झालेली आहे. पण विरोधकांनी हे एकदा ठरवावं. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मार्ग काढायचा की राजकारण करायचं हे ठरवलं पाहिजे. कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली.
मात्र, जर विरोधकांकडे यापेक्षा वेगळी माहिती असेल तर त्यांनी हक्कभंग आणावा'', असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर विरोधक लगेच शांत झाले. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलण्यास सुरवात केली आणि पुन्हा सभागृहाचे पुढील कामकाज सुरू झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.