काँग्रेसच्या दहा उमेदवारांवर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की

काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सत्ता संपादन करेल, असा दावा व्यक्त करण्यात आला होता.
काँग्रेसच्या दहा उमेदवारांवर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की
congressSarkarnama

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत कोणाचा राजकीय दबदबा असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क राजकीय वर्तुळातून लढवले जात होते. मात्र, त्याला पूर्णविराम मिळाला असून जिल्हा परिषदेवर शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे. या पोटनिवडणुकीत दोन जागा अधिकच्या मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना ५, भाजप ३, बहुजन विकास आघाडी ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १ जागेवर बाजी मारली आहे. (Deposits of ten Congress candidates were seized in Palghar)

एकीकडे शिवसेनेचे संख्याबळ या निवडणुकीत वाढले असताना महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारांना पालघरमध्ये आपले डिपॉझिटही राखता आले नाही. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा जागांपैकी एक सोडता १० जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले डिपॉझिट गमावले आहे. या पक्षाने विदर्भात यश मिळविले असताना पालघरमध्ये मात्र काँग्रेस एकही जागा जिंकू शकलेली नाही.

congress
दोन्ही काँग्रेसने उमेदवारीत डावलेले माजी सभापती बनले बैल! : गावातून मिरवणूक काढून व्यक्त केली नाराजी

पोटनिवडणुकीत पालघर तालुक्यातील ११ लढतींपैकी कोंढाण गणाव्यतिरिक्त सर्व जागांवर काँग्रेस उमेदवारांची निवडणूक अनामत रक्कम जप्त झाली आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या चार उमेदवारांचे, तसेच पाच अपक्ष उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सत्ता संपादन करेल, असा अंदाज माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला होता. तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील काँग्रेसला या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा दावा केला होता. पण, पक्षाच्या उमेदवारांना अनामत रक्कमही राखता न आल्याने या भागात काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

congress
‘छत्रपती’चे त्यावेळचे संचालक घरून दशम्या आणायचे आणि एकत्र बसून जेवायचे!

शिवसेनेने गड राखला

पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण १५ जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. सर्वच प्रमुख पक्षांनी आपला उमेदवार निवडून यावेत; म्हणून चांगलाच जोर लावला होता. पालघर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, या ठिकाणी पक्षाने गड राखण्यात यश मिळविले. माजी मंत्री व शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी शिवसेनेने जिल्हा परिषदेत २ जागा अधिक मिळवून राजकीय ताकद दाखवली आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नीता पाटील, विनया कोरे, अरुण ठाकरे, मिताली बागुल, सारिका निकम, राष्ट्रवादीचे लतिका बालजी, भक्ती वलटे, रोहिणी शेलार, अरुण चौधरी, भाजपचे पंकज कोरे, ज्योती पाटील, सुनील माच्छी, संदीप तावडे, सीपीएम अक्षय दवणे, अपक्ष हबीब शेख आदी निवडून आले आहेत.

Related Stories

No stories found.