सोमय्यांना दुहेरी धक्का; पाडकाम थांबले अन् परब दाखल करणार खटला

कोणाचे किती अनधिकृत बांधकाम आहे, याची यादी आमच्याकडेही आहे
Anil Parab -Kirit Somaiya news :
Anil Parab -Kirit Somaiya news :

Anil Parab -Kirit Somaiya news : दापोलीतील साई रिसॉर्टवर आज तोडकाम कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढच्या आठवड्यात याबाबत सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निर्णयानंतर पाडकामाची कारवाई होणार की नाही, हे कळणार आहे. तोडकामाबाबत उच्च न्यायालय आदेश देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने रिसॉर्टचे तोडकाम आज होणार असल्याने भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे दापोलीत दाखल झाले होते.

या सर्व घडामोडींवर अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. साई रिसॉर्टची मालकी माझी नसून सदानंद परब यांची आहे. पण तरीही सोमय्यांकडून जाणुनबुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यां विरुद्ध त्यांनी बोलून दाखवावे, असे आव्हान परब यांनी दिले.

Anil Parab -Kirit Somaiya news :
Tanaji Sawant : गोवरचा संसर्ग कसा रोखणार ? तानाजी सावंतांनी दिले उत्तर

''कोणाचे किती अनधिकृत बांधकाम आहे, याची यादी आमच्याकडेही आहे. आमची वेळ आली की आम्हीही त्यांची नावे बाहेर काढू, असा इशाराही अनिल परब यांनी दिला. माझ्यावर होत असलेले आरोप वैयक्तिक चारित्र्यहनन करण्यासाठी केले जात आहे. पण मी याविरोघात न्यायलयीन लढाई लढणार असून कोर्टातून निर्दोषत्व सिद्ध करणार आहे. माझी सोमय्या यांच्याविरोधात आता आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे परब यांनी म्हटले आहे.

त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सुभाष देशमुख यांच्या घरावरही हातोडा मारावा, पण सोमय्या सुपारी घेऊन काम करतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नारायण राणे आणि सुभाष देशमुख यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन गेले नाहीत. पण साई रिसॉर्टवर हातोडा घेऊन गेले, सोमय्या हे स्टंट नाही तर नौटंकी करत असल्याची टीकाही अनिल परब यांनी केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com