APP Delhi News : 'आप' चे अखेर ठरलं : महापौरपदासाठी प्राध्यापिका मैदानात..

Shelly Oberoi : दिल्ली येथील पटेल नगर पूर्व येथील वार्ड क्रमांक ८६ मधून शैली या पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
aap delhi mayor candidate news update
aap delhi mayor candidate news updatesarkarnama

APP Delhi Mayor Candidate News : आम आदमी पक्षाने १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करत दिल्ली महापालिका नुकतीच ताब्यात घेतली आहे. 'आप'ने २५० प्रभागांपैकी १३४ प्रभाग जिंकून बहुमताचा आकडा पार केला. आता सहा जानेवारी रोजी येथे महापौरपदाची निवडणूक होत आहे. आम आदमी पक्षाने महापौर पदासाठीचा उमेदवार जाहीर केला आहे. (aap delhi mayor candidate news update)

दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत 'आप'ने शैली ओबरॅाय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवरले आहे. तर उपमहापौरपदासाठी आले मुहम्मद इकबाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी ही घोषणा केली आहे.

शैली ओबरॉय या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्या दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. तर आले मोहम्मद इकबाल हे सहा वेळा आमदार झालेले आपचे नेते शोएब इकबाल यांचे चिंरजीव आहेत. त्यांनी १७ हजार मतांनी विजय मिळवला आहे.

aap delhi mayor candidate news update
Eknath Khadse : विलासराव देशमुख, निलंगेकरांप्रमाणेच शिंदे राजीनामा देतील का ? खडसेंचा सवाल

कोण आहेत शैली ओबरॉय

३९ वर्षीय शैली ओबरॉय या दिल्ली विद्यापीठात सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. नवी दिल्ली येथील पटेल नगर पूर्व येथील वार्ड क्रमांक ८६ मधून शैली या पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या मतदारसंघात पटेल नगर आहे. या ठिकाणी गुप्ता यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

शैली ओबरॉय या भारतीय वाणिज्य संघ (Indian Commerce Association)च्या आजीव सदस्य आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयातून तत्वज्ञान या विषयातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे. "मिस कमला रानी पुरस्कार"सह त्यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

aap delhi mayor candidate news update
Jaykumar Gore : अपघात नव्हे घातपात ? ; गोरे यांचे वडिल म्हणाले, 'पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी..

महापौरांची निवड कशी केली जाते?

  • दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७ अंतर्गत १९५८मध्ये दिल्ली महापालिकेची स्थापना करण्यात आली. २०१२ मध्ये ही महापालिका तीन भागांमध्ये विभागण्यात आली होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून हे तिन्ही भाग एकत्र करण्यात आले.

  • दिल्ली महानगरपालिकेचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. दिल्ली महानगरपालिका अधिनियम, १९५७च्या नियम ३५ नुसार प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या बैठकीत महापौरांची नियुक्ती केली जाते. नियमानुसार बहूमत असणाऱ्या पक्षाकडून महापौरपदासाठी दावा केला जातो.

  • विरोधी पक्षाने उमेदवार दिल्यास महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाते.या लढतीत संख्याबळ कोणाकडे आहे, नगरसेवक नेमके कोणाला मतदान करतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com