एकनाथ खडसेंना दिलासा; ईडीच्या नोटिसीला उच्च न्यायालयाची स्थगिती

एकनाथ खडसे यांना ईडीने (ED) घर खाली करण्याची नोटिस दिली होती
एकनाथ खडसेंना दिलासा; ईडीच्या नोटिसीला उच्च न्यायालयाची स्थगिती
Ncp Leader Eknath KhadseSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ईडीने (ED) घर खाली करण्याची नोटिस दिली होती, या नोटिसीला न्यायालयाने स्थगिती दिली, असल्याची माहिती खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी दिली आहे.

Ncp Leader Eknath Khadse
राज्यसभेच्या मतांचं काय? विधान परिषदेचा पत्ता कट होताच मेटेंनी भाजपला खिंडीत गाठलं

मोहन टेकवडे यांनी ईडीला (ED) पत्र लिहून दिल्ली न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भात कळवले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेवर आणि अडजुडीकटिंग अथोरिटीने दिलेल्या ऑर्डरवर स्थगिती दिली. त्यामुळे आता खडसे यांना घर खाली करावे लागणार नाही. ईडीने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याची नोटीस दिली होती.

Ncp Leader Eknath Khadse
भाजपनं शब्द देऊनही उमेदवारी दिली नाही! मेटेंनी टाकला बॉम्ब

पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणातील कथित गैरव्यवहारांच्या आरोपांवरून खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई प्रक्रियेत आहे. याप्रकरणी चौधरी अटकेत असून खडसे दांपत्यास न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. या प्रकरणातच ईडी ने खडसेंच्या काही मालमत्तांवर गेल्या काळातच टांच आणली होती. त्यानंतर या मालमत्ता रिक्त करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्या नोटीसीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in