दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं

Deepali Sayed| Raj Thackeray| राज ठाकरेंच्या कालच्या मुलाखतीनंतर सय्यद यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला दिपाली सय्यद यांनी उत्तर दिलं आहे.
Deepali Sayed| Raj Thackeray|
Deepali Sayed| Raj Thackeray|

मुंबई : " माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे, वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये, असे ट्विट करत शिवसेना (Shivsena) नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे.

शनिवारी (२३ जुलै) राज ठाकरे यांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत झाली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंच्या कालच्या मुलाखतीनंतर सय्यद यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला दिपाली सय्यद यांनी उत्तर दिलं आहे.

Deepali Sayed| Raj Thackeray|
शिवसेनेला धक्का...डॉ. विक्रांत मोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

2014 आणि 2017 मध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे विश्वास ठेवण्यासारखे नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते मात्र, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही" अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

दरम्यान, शनिवारी (२३ जुलै) ही दिपाली सय्यद यांनी मनसेवर टीका केली होती. शिंदे मंत्रीमंडळात मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंनी ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री पदाची अट घातली होती. मनसेच्या या भूमिकेवर दिपाली सय्यद यांनी,मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती ल्याची टीका केली. अमित ठाकरे म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेले गृहमंत्री असल्याची टीका दिपाली सय्यद यांनी केली.

''मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेट ने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री?'' असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी मनसेला टोला लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in