...तर आम्हीही मागेपुढे पाहणार नाही; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या इशाऱ्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे
deepak kesarkar, uddhav thackeray
deepak kesarkar, uddhav thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर निशाणा साधला होता. जे गेले ते विश्वास घातली आहेत, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला होता. त्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्त आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आजारपणात दुसऱ्या वरिष्ठ व्यक्तीस प्रमुख पद देण्याची परंपरा आहे. मात्र, तुम्ही ती पाळली नाही, विश्वास दाखवला नाही. मग आता विश्वास घातकी का म्हणताय? तुम्ही खूप चांगले मुख्यमंत्री होतात, पण फिल्डवर काम करणारे कॅप्टन एकनाथ शिंदे होते. जेव्हा महत्वाची काम करायची होती तेव्हा एकनाथ शिंदे हवे होते. मात्र, जेव्हा चार्ज द्यायची वेळ आली तेव्हा शिंदे का नको होते, असा सवाल केसरकर यांनी केला.

deepak kesarkar, uddhav thackeray
'उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपमधील एक गट अस्वस्थ!'

उपमुख्यमंत्री पद देऊ केले होते. मात्र, तेव्हा एकनाथ शिंदे यांना का दिले नाही? तुम्ही सगळ्या गोष्टी काढायला लागलात तर आम्हीही मागेपुढे पाहणार नाही, अशा इशाराही केसरकर यांनी दिला. ज्यांच्याकडे बहुमत नसते ते रडीचा डाव खेळतात. आम्हाला गरज नाही, लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

deepak kesarkar, uddhav thackeray
Nashik Breaking; शिवसेनेने इशारा देताच ४ हल्लेखोर पोलिसांकडून अटक

उद्धव ठाकरे यांच्या विषयी काही बोलणार नाही. पण जे मुद्दे येतील त्याला उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज मुंबईच्या माजी महापौरांनी ट्विट केले. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून मी खुलासा देतो. मी मुख्यमंत्र्यांना विन्नती केली होती की आंतरराष्ट्रीय शाळेत माझ्या नातवाला प्रवेश हवा आहे. पण तिथे न देता इथल्या एका शाळेत प्रवेश दिला. पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळवीन, असेही केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com