दीपक केसरकरांनी फोडले संजय राऊतांच्या डोक्यावर खापर : काँग्रेस व राष्ट्रवादीवरही आरोप

आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी राज्यातील घटनांचे खापर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले आहे.
Deepak Kesarkar News, Sanjay Raut News, Maharashtra Political Crisis
Deepak Kesarkar News, Sanjay Raut News, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनाक्रमावर राज्याचे माजी मंत्री तथा एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी भूमिका मांडताना राज्यातील घटनांचे खापर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले आहे. Shiv Sena rebels News Update

दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी साहेब यांना किती आदर होता आणि आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे असा प्रकार कधीही घडला नव्हता याचा मी स्वतः साक्षीदार आहे. जे काही आरोप होत होते ते संजय राऊत यांच्याकडून होत होते. देशातील सर्वोच्च नेत्याचा अवमान करणारे त्यांचे स्टेमेंट होते. त्यामुळे त्याच बरोबर राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून मोदींचे बाळासाहेब ठाकरे व मातोश्रीं बरोबर असलेले संबंध हे सर्व गृहित धरले तर हे आरोप संजय राऊत यांच्याकडून व्हायला नको होते. त्यामुळे संजय राऊत जेवढे कमी बोलतील तेवढे चांगले आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.(Deepak Kesarkar News in Marathi)

Deepak Kesarkar News, Sanjay Raut News, Maharashtra Political Crisis
दीपक केसरकर म्हणाले, खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही...

ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आमची बैठक झाली आहे. त्यांनी सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. ते सर्व आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतात. आमच्याशी बोलूनच ते पुढील भूमिका ठरवितात. त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. आम्ही त्यांना सर्व अधिकार दिले आहेत. ते चांगल्या पदावर होते. ते आमचे चांगले नेते आहेत. शिवसेना पक्ष नाहिसा करण्याचा प्रयत्न झाला. असा पक्ष संपविण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. प्रत्येकाच्या मतदार संघात जाऊन त्यांचे अध्यक्ष आपला उमेदवार जाहीर करायचे. हे तुमचा पुढील आमदार असल्याचे सांगायचे. त्यांच्या पराभूत उमेदवाराला ताकद देण्याचे काम सुरू होते, असा आरोप त्यांनी केला.

Deepak Kesarkar News, Sanjay Raut News, Maharashtra Political Crisis
Gulabraao Patil: संजय राऊत यांना योग्य वेळी चूना लावू; गुलाबराव पाटलांचा टोला

ज्यावेळी पक्षाच्या अस्तित्त्वाचा प्रश्न येतो त्यावेळी आपण कुटुंबाच्या प्रमुखाकडे जातो. त्याप्रमाणे शिंदेंनी आपली व्यथा शिवसेना प्रमुखांकडे मांडली. राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मतदान केले नाही. हे स्वतः संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. अशा वेळी शिवसेनेच्या आमदारांचे असे म्हणणे होते की, आम्ही मतदान करतो. आम्ही त्यांचे उमेदवार निवडून आणतो. ते आमचे उमेदवार पाडत असतील, राज्यातील सरकारमध्येही दुय्यम वागणूक देतात. मग आम्ही या सरकारमध्ये राहून काय उपयोग आहे. यामागे आमच्या पक्ष प्रमुखाची प्रतिष्ठा होती. त्यांनी सांगितले होते की, सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवेल, त्यांचा हा शब्द खोटा पाडण्यात सहयोगी पक्षाचा हात असेल तर त्यांनी ताबडतोब कारवाई करायला हवी होती. काय झाले हे आमदारांच्या समोर यायला हवे होते, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com