केसरकरांना कोणी तंबी दिली? म्हणाले, राणेंबद्दल बोलणार नाही...

दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका केली होती
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama

Deepak Kesarkar : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत असल्याने लवकरच किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ही कारवाई होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मी राणे यांच्याबद्दल बोलणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

दिपक केसरकर यांना भाजप (BJP) आणि शिंदे गटात दुरी निर्माण होईल, अशी विधाने करू नयेत अशी ताकिद देण्यात आल्याची माहिती होती. त्यानंतर केसरकर यांनी राणे यांच्याबद्दल बोलणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Deepak Kesarkar
Ajit Pawar यांनी कारणांसह सांगितले.. : महापालिका निवडणुका कधीही होऊ शकतात

पत्रकार परिषदेमध्ये केसरकर म्हणाले, मी चार वेळा पक्ष बदलला हा विषय नाही. तुम्ही युती करणार होता, ती केली नाही आता शिंदे यांनी युती केली भाजप बरोबर तर काय चुकले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता यात्रा काढता आमदारांना विशेषण देता हे योग्य आहे का? तुम्ही निवडणुकीत युती केली मग तोडली. नंतर पुन्हा करणार होता मग आता गद्दार का बोलतात. माझे आणि राणे यांचे वाद सगळ्यांना माहीत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राणे यांची तक्रार केली नाही.

ठाकरे यांची बदनामी करणे योग्य की अयोग्य हे कोणालाही विचारले तर अयोग्यच असेल. शिवसेना आणि भाजप एकत्र येणार होते मग तुम्ही केले तर ते चांगले आम्ही केले तर वाईट ते योग्य नाही. माझे आणि राणे यांचे वाद नाहीत. मला शिवसैनिकांचे फोन येतात की उद्धव साहेब आणि शिंदे साहेबांना एकत्र आणा, अनेकदा प्रयत्न केले पण होत नाही. आम्ही आता काम करत आहोत. आम्ही निवडणुकीत भाजप बरोबर गेलो आता बाळासाहेबांच्या विचारवर मोहोर उमटवली आहे, असे केसरकर यांनी सांगितले. तसेच कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राणे यांच्यासोबत काम करण्याची तयारी आहे. कोकणी माणसावर विकासासाठी अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Deepak Kesarkar
नारायण राणेंशी पंगा घेतल्याचा केसरकरांना फटका... शिंदेंनी घेतला कठोर निर्णय

तुमच्यासाठी जे लोक काही करतात तर त्यांचे कौतुक करा. मी शिवसेनेत आलो कारण शिवसेना मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. मुंबई महापालिकेत भाजपने बिनशर्त शिवसेनेला पाठिंबा दिला होता. राणे साहेबांबद्दल बोलले जाते मग विनाकारण वाद उफलून येतो. मला ह्याची गरज नाही. आदित्य ठाकरे जिथे जाऊन आले तिथे शिवसेना पराभूत झाली. बाळासाहेब शिवसेना आणि आताची शिवसेना वेगळी आहे. उगाच गर्व बाळगण्यात अर्थ नाही, असेही केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com