फडणवीस दिल्लीला, याचा अर्थ मंत्रिमंडळाची यादी तयार; केसरकर झाले खूष

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झाले आहे
Devendra Fadnavis, Deepak Kesarkar
Devendra Fadnavis, Deepak Kesarkarsarkarnama

Deepak Kesarkar : मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, दिल्ली वारी होते आहे याचा अर्थ मंत्रिमंडळाची यादी तयार आहे.

सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असताना, न्यायालयात सुनावणी सुरु असतांना बोलणे चुकीचे आहे. मीडिया ट्रायल होऊ नये, न्यायालयाचा मान ठेवावा, असेही केसरकर यांनी सांगितले. प्रत्यक्ष सुनावणीत काय झाले हे ही सांगणे गरजेचे आहे. कोणालाही घटनाज्ज्ञ म्हणून प्रतिक्रिया देने आणि निर्णय काय होईल हे सांगणे चुकीचे आहे.

Devendra Fadnavis, Deepak Kesarkar
Supreme Court : राज्यपाल कोश्यारींच्या वागणुकीचं ऑडिट होणं गरजेचं !

चिन्हा बाबत, पक्षा बाबत कुठीही चर्चा सुनावणीमध्ये झाली नाही. मंत्रिमंडळ विस्तार करू नका, असे न्यायालयाने म्हटले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी व्हावा हे मुख्यमंत्री राज्यपाल यांना कवळतील. दिल्ली दौरा होतोय याचा अर्थ मंत्रिमंडळ याद्या फायनल झाल्या आहेत हे समजावे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Deepak Kesarkar
Parbhani : तिघांचे घ्या, चौथ्याला मतदान करा, आमदार गुट्टेंचा लक्ष्मीदर्शनाचा नवा फंडा..

दरम्यान, मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांच्या याच नावांवर अंतिम हात फिरविण्यासाठी फडणवीस हे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. आजचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करुन फडणवीस दिल्लीला गेले आहेत. ते या भेटीत भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या भेटीत नेमकी कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in