आमच्या कुटुंब प्रमुखांबद्दल कोणिही वाईट बोलू नये; केसरकरांनी सुनावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest News
deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी पुन्हा एकदा त्यांनी सर्वांना अलर्ट केले आहे. आमच्या कुटुंब प्रमुखांबद्दल कोणिही वाईट बोलू नये, असे ते म्हणाले. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याव टीका केली होती. त्यारुन शिंदे गटातील आमदारांनी सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

या संदर्भात दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना-भाजपची युती झाल्यावर पक्षप्रमुखांच्या बाबतीत वाईट बोलणार नाही असे आधीच ठरले होते. मात्र, सोमय्या बोलले. यानंतर मी म्हटले होती की, सोमय्या हे भाजपचे संजय राऊत (Sanjay Raut) आहेत का? ते विधान मी मागे घेतो, असेही केसरकर म्हणाले.

आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदरच आहे. त्यांना आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असेही केसरकर यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. 'मातोश्री'वर जेव्हा आरोप झाले तेव्हा आमचे व्यासपीठ वापरु नये, असे भाजप आमदारांचे मत होते, असेही ते म्हणाले. पक्ष चिन्हावर कोणीही दावा केलेला नाही. आता आमची युती झाली, त्यामुळे युती सारखच बोलणे झाले पाहिजे. एकीकडे शिवसैनिक दुखावले, मात्र, काही जण सुखावले. वेळेनुसार जखमा भरल्या जातात, दुःख व मतभेद विसरले जातात. त्यामुळे ही वेळ जाण्याची वाट पाहतो आहेत, असेही ते म्हणाले.

deepak kesarkar, Uddhav Thackeray Latest News
मुंबईची काळजी करु नका, शिवसेनेचे तुकडे होताहेत, ते पाहा ; दरेकरांनी राऊतांना सुनावलं

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वक्तव्य केले होते, तेव्हा मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. आपल्याला एकत्र काम करायचे आहे, ठाकरे कुटुंबाचा मान राखला पाहिजे. आम्ही एकत्र मनापासून आलो. संजय राऊत काल देखील बोलले, राऊत साहेबांचे बोलणे हळू हळू सौम्य होईल, असही केसरकर म्हणाले. मी पर्मनंट प्रवक्ता नाही, महाराष्ट्रची संस्कृती राखली पाहिजे, ही भाषा महाराष्ट्राची नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in