दीपक केसरकरांच्या भूमिकेने सगळेच आवाक झाले!

Deepak Kesarkar : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना घरी जाण्याची घाई
Legislative Council
Legislative CouncilSarkarnama

Deepak Kesarkar : मुंबई : मला घरी एक कार्यक्रम आहे, त्यासाठी मला गेलेच पाहिजे, माझे प्रश्न लवकर घ्या... माझी ९३ ची सूचना मला लवकर टेबल करू द्या... असे हातघाईवर येत विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्या झाल्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तगादा लावल्याने विधानपरिषदेत (Legislative Council) सगळेच आवाक झाले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाजाचे केवळ सहा दिवस होते. अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असतानाही कौटुंबिक कार्यक्रम महत्त्वाचा का अशी कुजबूज सुरू झाली होती.

शिंदे - भाजप (BJP) युती सरकारच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात मंत्री सभागृहात नसल्यामुळे अनेकवेळा विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मंत्रीमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह २० कॅबिनेट मंत्री असून एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे विधानसभा, विधानपरिषदेतील कामकाजाला सामोरे जाताना मंत्र्यांची दमछाक होताना दिसून आले.

Legislative Council
आमदारांच्या 'पीएं'ना अच्छे दिन; विधेयकाचे नाव पाहून अजितदादा म्हणाले आमची नाहक बदनामी होते...

बुधवारी तर मुख्यमंत्र्यांनी बैठकांमुळे आपल्याकडील सर्व खात्यांची उत्तरे देण्याचा अधिकार मंत्री शंभूराज देसाई यांना दिले होते. मात्र विरोधकांनी मुख्यमंत्री नाहीत म्हणून ती लक्षवेधी राखून ठेवावी लागली होती. तर त्याच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला घरी कार्यक्रम आहे, माझ्या खात्याचे प्रश्न लवकर घ्या अशी विनंती सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण विभागाचे प्रश्न होते.

Legislative Council
मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार फटकेबाजी अन् आव्हाडांनी हातच जोडले...

त्यात प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, मला घरी एक कार्यक्रम आहे, माझे प्रश्न लवकर घ्या, माझे आणखी पाच प्रश्न आहेत. मला घरी छोटासा कार्यक्रम आहे, मला त्यासाठी गेले पाहिजे, त्यामुळे मी विनंती करतो पुढचा प्रश्न घ्या. त्यानंतरही सभागृहाचे इतर कामकाज सुरु असतानाही केसरकर यांनी मला घरी लवकर जायचे आहे माझी ९३ ची सूचना मला घ्या या विनंतीमुळे सभागृहातील कामकाजाबाबत मंत्री गंभीर आहेत का हा प्रश्न विचारला जातो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in