Deepak Kesarkar : '' कुणीही उठायचं अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घसरायचं...''

Deepak Kesarkar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीच वादग्रस्त वक्तव्य केलेेले नाही...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Deepak kesarkar Latest News : भाजप नेते व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवनेरीवर येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यावरुन आता शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) घसरायचं, हे योग्य नाही अशा शब्दांत टीकाकारांना सुनावलं आहे.

Eknath Shinde
Bhaskar Jadhav; नारायण राणेंना सध्या कोणीही विचारीत नाही

मंत्री दीपक केसरकर हे शिरुर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. केसरकर म्हणाले,राज्यपालांकडून छत्रपतींबद्दल विधान निघाले असेल. मात्र, राज्यपाल हे भाजपाचे नेते नाहीत, तर ते घटनात्मक पदाचे प्रमुख आहेत. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीच वादग्रस्त वक्तव्य केलेेले नाही. आणि छत्रपतींचा अपमान महाराष्ट्रात सहन करणार नाही असा थेट इशाराही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यावेळी दिला.

Eknath Shinde
Bhagat singh Koshyari : गुजरात निवडणुकीनंतर होणार राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी?

मागील महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट मिळत नव्हती. तसेच या कालावधीत राज्यातल्या अनेक समस्यांवर बैठका लावू शकले नाहीत. त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचाही आधिकार नाही. फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या मात्र कृतीतून वेगळंच करायचं असं सध्या सुरु आहे. एवढे दिवस बाळासाहेबांच्या विचारांवर चालले नाहीत आणि आता त्यांना अनेक विचारांची गरज भासत आहे. असा टोला देखील केसरकरांनी यावेळी ठाकरेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com