Deepak Kesarkar : केसरकरांनी थेट शिक्षक-पदवीधर निवडणुकींचा निकाल सांगितला!

Deepak Kesarkar : सत्यजीत तांबे यांच्याबाबत केसरकर काय म्हणाले?
Deepak Kesarkar : Satyajeet Tambe
Deepak Kesarkar : Satyajeet Tambe Sarkarnama

Deepak Kesarkar : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्हं कुणाला? हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पायरीवर पोहचला आहे. उद्या दि. ३० जानेवारी रोजी आयोगात याची सुनावणी पार पडणार आहे, याप्रकरणी उद्या निकाल येण्याची अधिक शक्यता आहे. मात्र यावर आता शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी धनुष्यबाण आम्हालाच मिळणार असा दावा केला आहे.

Deepak Kesarkar : Satyajeet Tambe
Bageshwar Baba News : बागेश्वर बाबांनी उधळली मुक्ताफळे; संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं..

केसरकर यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्या होणाऱ्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबद्दल ते म्हणाले, "सत्यमेव जयते, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब राहिले. बाळासाहेबांची शिवसेनाच शिवसेना आहे.त्याच्यामुळे धनुष्यबाण हे चिन्हं आमचंच आहे, याची मला खात्री आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे."

Deepak Kesarkar : Satyajeet Tambe
Ajit Pawar News : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? अजितदादांनी स्पष्टच सांगितले…

विधानसभा निवडणुकीतील शिक्षक व पदवीधर जागेबाबत त्यांना विचारले असता केसरकर म्हणाले, "चार जागेवर भाजप आणि एका जागेवर अपक्ष निवडून येथील, अशी आम्हाला अपेक्षा आहे." अप्रत्यक्षपणे त्यांनी नाशिक पदवीधर जागेवर अपक्ष असलेल्या सत्यजीत तांबे हे विजयी होतील असे सुतोवाच केले.

Deepak Kesarkar : Satyajeet Tambe
Ajit Pawar : लव जिहादच्या नावाखाली जाती-जातीत विष पेरण्याचं काम : अजित पवारांचा हल्लाबोल!

ते पुढे म्हणाले, "बंजारा समाजाच्या सेवालाल महाराजांचं पूजन करत असतो. वेगवेगळ्या देवतांची मंदिरे पोहरादेवी येथे आहेत. या परिसराचा विकास व्हावा यासाठी आमदार संजय राठोड यांनी प्रयत्न केले. राठोड यांनी पोहरादेवी देवस्थान परिसराच्या विकासासाठी जे प्रयत्न केलेत त्याला तोड नाही. बंजारा समाजाचं संस्कृती जपण्याचं काम त्यांनी केलं आहे. सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com