शिंदेंना ठाकरेंनीच मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं ; केसरकरांचा पुनरुच्चार

ठाकरे किती वेळा मंत्रालयात गेलेत, जनतेला किती वेळा भेटले, ते आता शाखांमध्ये फिरु लागले आहेत.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSarkarnama

मुंबई : मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी सुरु आहे. आज मुख्यमंत्री राष्ट्रपतींची शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Deepak Kesarkar news update)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचं बोलणं सुरू होतं. १२ आमदारांना निलंबन केल्यानंतर हे बोलणं थांबलं. ही बाब खरी आहे का?, असे मी विचारले होते. परंतु याचे उत्तर ते देऊ शकलेले नाहीत. हे महाराष्ट्रातील जनतेने आणि शिवसैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज ज्या तुमच्या भावना भडकावल्या जात आहेत. त्या कितपत योग्य आहेत, याचा विचार करा. जो तुमचा मनुष्य मुख्यमंत्री झाला आहे. त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की, तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिलेले आश्वासन पाळलं नाही. केंद्रांवर आरोप करीत आघाडी सरकारचे अडीच वर्ष गेली. आता तरी कोणी राजकारण करु नये. आम्हाला राजकारण नको,काम कारायचे आहे. महाराष्ट्राचा विकास थांबवू नका. महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे, रोज केंद्रावर आरोप करणे थांबले पाहिजे. महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकारण करू नये,"

Deepak Kesarkar
Droupadi murmu : राष्ट्रपती भावुक, म्हणाल्या, "मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी.."

"बाळासाहेबांनी दिलेले आश्वासन ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे. इतर आश्वासन पूर्ण केलं नसल्यामुळे ते स्वत: तुमच्याकडे आले. तुम्हीच मुख्यमंत्री रहा असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. परंतु आम्हाला हिंदुत्वासोबत जायचंय असं सांगितल्यावर तुम्ही का ऐकलं नाहीत," असे केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंची उद्या मुलाखत आहे, याबाबत केसरकर म्हणाले, "मी ठाकरेंची मुलाखत पाहिली, पण मी त्याच्यावर काही बोलणार नाही. उद्धव साहेबांचा आदर आहे, तो कायम राहील. आम्हाला राजकारण नको,काम कारायचे आहे. राज्यात अतिवृष्टी सुरु असताना घाणेरडे राजकारण सुरु आहे,"

"उद्धव ठाकरे आजारी होते म्हणून आम्ही हे षडयंत्र केले असे लोकांना सांगितले जात आहे. हे चुकीचे आहे. आम्ही कटकारस्थान केलेलं नाही. तुम्हाला लोक भेटत होते. तुमच्याकडे तक्रार करीत होते. आघाडी तोडा असे सांगत होते. ठाकरे किती वेळा मंत्रालयात गेलेत, जनतेला किती वेळा भेटले, ते आता शाखांमध्ये फिरु लागले आहेत. आज मुंबईत दिसू लागले आहेत," असे केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in