‘पवार कुटुंबीयांतील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे आधी जाहीर करा’

आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या मनात २०१४ मधील खरे मुख्यमंत्री हे गोपीनाथ मुंडे होते, असे वक्तव्य नगरमध्ये बोलताना केले होते.
‘पवार कुटुंबीयांतील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे आधी जाहीर करा’
Pravin Darekar-Rohit PawarSarkarnama

मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अगोदर पवार कुटुंबीयांमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे, हे जाहीर करावं, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी दिले. (Declare who is the chief ministerial candidate from Pawar family first : pravin darekar)

आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या मनात २०१४ मधील खरे मुख्यमंत्री हे गोपीनाथ मुंडे होते, असे वक्तव्य नगरमध्ये बोलताना केले होते. त्याला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलून वाद सुरू करणं, महत्त्वाचं नाही. पवार कुटुंबीयांतील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे, हे रोहित पवार यांनी प्रथम जाहीर करावं. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उमेदवार आहेत का रोहित पवार यांच्या मनाच्या कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्रीपदाची ओढ आहे, हेही त्यांनी सांगावं. घरातला विषय आहे म्हणून एक उमेदवार निश्चित करा आणि मग आमच्या हयात नसलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी बोला.

Pravin Darekar-Rohit Pawar
राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून द्या; पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवतो : अजितदादांनी दिला शब्द!

हयात नसलेल्या व्यक्तींचा वापर करून वाद निर्माण करायला, रोहित पवार अजून लहान आहेत. पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. जिथे जिथे त्या गेल्या आहेत, तिथं तिथं त्यांनी संधीच सोनं करुन दाखवलं आहे. त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत, तिथे त्यांनी पक्षाच्या संघटनेचे काम केलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेत असतात. मोठ्या नेत्यांवर बोलणं ठरणार उचित नाही, असेही त्यांनी रोहित पवारांचे कान टोचले.

Pravin Darekar-Rohit Pawar
‘आवताडे गटाला हरवाचायं तर जागेसाठी अडू नका अन्‌ हळकुंडासाठी लगीन मोडू नका...’

काय म्हणाले होते रोहित पवार?

जनतेच्या मनात २०१४ मधील खरे मुख्यमंत्री हे गोपीनाथ मुंडे होते. पण, दुर्दैवाने त्या गोष्टी घडल्या नाहीत. आपल्याबरोबर आज ते नाहीत. गोपीनाथ मुंडे आज असते, तर राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या स्तरावर गेली नसती. विरोध झाला असता. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांमध्ये वाद झाला असता. मात्र, संस्कृती आणि पातळी सोडून कोणी बोललं नसतं. आज ते नसली तरी त्यांचे विचार तुमच्या आमच्या ध्यानात आहेत. त्यांचाच विचार घेऊन, त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण, समाजकारण केले, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांची काळजी घेतली, त्याच पद्धतीने यापुढे आपण काम करायचे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे काम करत आहेत, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in