बारा आमदारांचा आज फैसला; भातखळकर, महाजन, सातपुते विधानभवनात येणार नाहीत

बारा आमदारांच्या निलंबनावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Maharashtra Assembly
Maharashtra AssemblySarkarnama

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Assembly Session) गदारोळ घातल्याच्या कारणास्तव निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या (BJP) बारा आमदारांचा आज फैसला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निलंबनाला स्थगिती दिल्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांकडे निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे. पण या सुनावणीला सर्व बारा आमदार हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजप आमदारांनी निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षाकडून तायी दखल घेण्यात आली आहे. त्यावर आज दुपारी दोन वाजता विधानभवनात सुनावणी होणार आहे. आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह इतर काही आमदार विधानभवनात उपस्थित राहणार आहे. उद्या (ता. 11 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात निलंबनाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याआधीच निलंबन मागे घेतले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Maharashtra Assembly
भाजपला मोठा धक्का; महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

या सुनावणीला आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), गिरीश महाजन (Girish Mahajan) व राम सातपुते (Ram Satpute) उपस्थित राहू शकणार नाहीत. तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे त्यांना हजर राहता येणार नाही. भातखळकर यांनी याबाबत विधिमंडळ सचिवांना पत्र दिलं आहे. सर्वोच्य न्यायालयाने 14 डिसेंबर 2021 रोजी विधिमंडळास नोटीस जारी केली होती. निलंबित आमदारांनी याबाबत अर्ज करूनही अधिवेशन कालावधीत काहीच निर्णय घेतला गेला नाही. आता उपाध्यक्ष यांना अध्यक्षपदाचा प्रभारी चार्ज असल्याने थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यामुळे आता लेखी उत्तर तुर्तास विधीमंडळ सचिव यांना कळवत असल्याचे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

काय घडलं पावसाळी अधिवेशनात?

पावसाळी अधिवेशानात विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. एक वर्षासाठी या सदस्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित सदस्यांना वर्षभर मुंबई आणि नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly
गोव्यात भाजपला झटका; बड्या नेत्याचा मंत्रिपदासह आमदारकीचाही तडकाफडकी राजीनामा

हिवाळी अधिवेशनापूर्वी 12 आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले होते. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून 10 डिसेंबरला निलंबित आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयात 12आमदारांच्या हाती निराशा लागली. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्यानं अधिवेशनात 12 आमदारांना उपस्थित राहता आले नाही. येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.

या आमदारांना करण्यात आलं आहे निलंबित...

आशिष शेलार, अभिमन्यू पवार,  अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com