'मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा नव्हे तर निवडणूकांमुळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेण्याची मोठी घोषणा आज केली.
'मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा नव्हे तर निवडणूकांमुळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (agricultural act) मागे घेण्याची मोठी घोषणा आज केली. आज देशातील नागरिकांशी संवाद त्यांनी संवाद साधला. त्यानंतर देशभरातून आनंदाची लाट उसळली आहे. राज्यभरातील शेतकरी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळी स्पष्ट केले.

ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. देशातील आगामी निवडणूकांचा विचार करता केंद्रसरकारने कृषी कायदे माग घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. पण या लढ्या दरम्यान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या, हिंसाचार देश आणि शेतकरी कधीही विसरणार नाही, असेही रघुनाथदादा पाटील यांनी म्हटले आहे.

'मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा नव्हे तर निवडणूकांमुळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय'
मोदी यांची मोठी घोषणा ; तीनही कृषी कायदे मागे घेणार

तर, रघुनाथ दादा पाटील यांच्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रसरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण आतापर्यंत या लढ्यात अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले, केंद्रसरकारने आगामी निवडणूकांच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतला आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज (१९ नोव्हेंबर) देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोंदीना तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या. माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत, अनेक सुविधा दिल्या. कृषी बजेट पहिल्यापेक्षा पाच पट वाढवलं चार वर्षात १लाख कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली, असे मोदींनी सांगितलं

मोदी म्हणाले, ''१० कोटी पेक्षा अधिक शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ३ कायदे केले होते. १ लाख ६४ हजार कोटी रुपयांचा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करणार आहे.''

Related Stories

No stories found.