दुध 'एफआरपी'बाबत शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करूनच निर्णय; अजित पवारांचे आश्वासन

दूध क्षेत्राला milk sector रेव्हेन्यू शेअरींगचे Revenue Sharing धोरण लागू करावे, यासह प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी Milk producing farmers संघर्ष समिती सातत्याने संघर्ष करत आहे.
Ajit Pawar in Milk Committe Meeting
Ajit Pawar in Milk Committe Meetingsarkarnama

मुंबई : दूध 'एफआरपी' बाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना दिले.

दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे यासाठी स्थापन केलेल्या मंत्री समितीने शेतकरी व शेतकरी प्रतिनिधीचे म्हणणे समजून घेऊनच याबाबत आपला अहवाल तयार करावा, असे निवेदन करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री व दूध एफआरपीबाबत स्थापन केलेल्या मंत्रिगटाचे अध्यक्ष अजित पवार यांची देवगिरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले.

Ajit Pawar in Milk Committe Meeting
राज्यात सर्वाधिक दूध दर 'या' डेअरीचा  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नाबाबत शिष्टमंडळाबरोबर पाऊण तास सविस्तर चर्चा केली व दूध एफआरपीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले.

Ajit Pawar in Milk Committe Meeting
अजित पवार नसते तर महाआघाडी सरकारचं टिकलं नसतं : मोहितेंचा खळबळजनक दावा

दूध खरेदीदराच्या अस्थिरतेमुळे राज्यात दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर व नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो. दूध क्षेत्रातील ही अनिश्चितता संपवण्यासाठी व दुधाला किमान आधारभाव मिळावा, यासाठी दुधाला एफआरपीचे संरक्षण लागू करावे व दूध तसेच दुग्धपदार्थांच्या निर्मिती व विक्री मध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबाला रास्त वाटा मिळावा. यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे, यासह प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सातत्याने संघर्ष करत आहे.

Ajit Pawar in Milk Committe Meeting
भाजपचे दूध दरवाढ आंदोलन म्हणजे नौटंकी : तुपकर 

संघर्ष व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुधाला एफ.आर.पी. लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. मंत्रिगटाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. शिवाय मिल्को मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवावी, दुधातील भेसळ बंद करण्याबाबत ठोस पावले टाकली जावीत, राज्यात दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करून दूध उत्पादकांना न्याय द्यावा, पशुखाद्याच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत धोरण घेतले जावे.

Ajit Pawar in Milk Committe Meeting
Shivsena : मोदी सरकार आवळा देऊन कोहळा काढते ; तरी शेतकरी दोन हजार आले की गावभंर सांगतो..

दूध क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी दूध संघांना संरक्षण देऊन सहकार मजबूत करण्यासाठी अधिक गांभीर्यपूर्वक धोरणे घेतली जावीत. खाजगी कंपन्यांच्या लुटमारीच्या विरोधामध्ये कायदा करावा यासह नऊ मागण्यांचे निवेदन यावेळी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. दूध प्रश्नांचे अभ्यासक सतीश देशमुख व दूध उत्पादक शेतकरी खंडूबाबा वाकचौरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com