Dasara Melava : शिवसैनिकांनो.. वाजत-गाजत, गुलाल उधळत या !

Dasara Melava : आज न्याय मिळाला. हा लोकशाहीचा विजय आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन (Shivsena Dasara Melava 2022) वाद पेटला होता. याबाबत शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळली असून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. (Shivsena Dasara Melava 2022 latest news) आता यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

"आज न्याय मिळाला. हा लोकशाहीचा विजय आहे. आपल्या परंपरेला गालबोट लागले नाही. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी वाजत गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत पण शिस्तीत या," असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले. "राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, शिंदे गटाला आता सुप्रिम कोर्टात जायचं असेल तर ती त्यांची मर्जी, " असा टोला ही ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray
दसरा मेळावा : सत्य परेशान हो सकता है पराजित नही; उद्धव ठाकरेंचा दरारा कायम!

हा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या नेत्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत आणि आभार मानले जात आहे. यावर लगेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्थेचे आभार, आम्हाला न्याय मिळेल यावर आधीपासूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विश्वास होता. यामुळे परंपरेनूसार ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार आहे. आतापर्यंत शिवसेनेचे परंपरेनुसार मेळावे इथेच घेतले गेले. आताही इथेच होणार आहे. आमच्या मेळाव्यासाठी व्यत्यय आणण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. आता आमची परंपरा सुरूच राहणार. त्यांनी काळी मांजर सोडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा न्यायालय त्यांना धडा शिकवेल. आता असाच निर्णय सर्वोच्च न्यायालय देखील देईल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in