Dasara Melava 2022 : राजकारण पेटलं ; राजीनामा देतो, असे म्हणणाऱ्या शिंदेंचे 'ते' भाषण व्हायरल

Dasara Melava 2022 : 'मी शिवसैनिक आधी, मग मंत्री, भाजपबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही..
Dasara Melava latest news
Dasara Melava latest newssarkarnama

पुणे : शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Dasara Melava) आज (बुधवारी) होत आहेत. मेळाव्यातील भाषणापूर्वीच जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपसोबत सत्तास्थापन करण्यापूर्वी भाजपच्या विरोधात शिंदेंनी केलेल्या भाषणांच्या क्लिप्स् सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहेत. याला एकनाथ शिंदे आज उत्तर देणार का, हे सांयकाळी समजेल. (Dasara Melava latest news)

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या आम्ही वासरदार आहोत,' असे म्हणणाऱ्या शिंदेंनी यापूर्वी भाजपच्या विरोधात केलेले भाषण, बाळासाहेबांनी भाजपच्या विरोधात केलेली विधाने सध्या व्हायरल होत आहे, यामुळे शिंदे गट (Shinde Group Dasara Melava) कोंडीत सापडला आहे.

'सत्तेसाठी सगळं सहन करणार नाही, शिवसेना महाराष्ट्रासाठी आहे, संपूर्ण देशावर राज्य करा..' असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे, 'मी शिवसैनिक आधी, मग मंत्री, भाजपबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही,' असे म्हणणारे एकनाथ शिंदे यांचे ही भाषणे व्हायरल होत आहेत.

शिवसेना-भाजपचे युती सरकार होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या सभेत भाजपबाबत नाराजी व्यक्त केली होती.

'भाजपच्या दडपशाहीत मी मंत्रीपदी राहू शकत नाही,' असे जाहीर सभेत सांगत व्यासपीठावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिंदेंनी राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण सध्या व्हायरल होत आहे.

Dasara Melava latest news
Dasara Melava : शिंदे गटाच्या मेळाव्यात व्यासपीठावर बाळासाहेबांची खूर्ची अन् चाफ्याची फुलं..

या दोन्ही मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. राज्याच्या सत्तासंघर्षातला कळीचा मुद्दा ठरलेला दसरा मेळावा आज शिंदे गट आणि ठाकरे गट साजरा करत आहेत. एकमेकांवर शरसंधान, आरोप प्रत्यारोप, राजकीय तोफा आज शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर डागतील.

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार या वादावर पडदा पडल्यानंतर, कोणाच्या गटाला सर्वाधिक गर्दी होणार याची चर्चा सुरु आहे. शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी शिंदे गट आणि भाजपवर 'सामना' संपादकीयमधून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्रातून नष्ट झालेला दिसेल, असे अग्रलेखातून म्हटले. 'तुमच्या छाताडावर बसून मुंबई जिंकूच', असा इशारा शिंदे गटाला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in