दानवे म्हणातात, महाविकास आघाडी सरकारमुळेच 'वेदांता' प्रकल्प गुजरातला गेला...

Raosaheb Danve : महाराष्ट्राला तोडणारा या देशात जन्माला यायचा आहे.
Central State Railway Minister Raosaheb Danve News
Central State Railway Minister Raosaheb Danve NewsSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रासाठी महत्वाचा असलेला 'वेदांता' ग्रुपचा प्रकल्प हा गुजरातला जाणार आहे. यावरून राज्यातील विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेलाच कसा? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यामुळे राज्य सरकारची पुरती गोची झाली आहे.

दरम्यान यावर भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून राज्याबाहेर गेलेला वेदांता प्रकल्प हा मागच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमुळे गुजरातला गेला आहे. ही घटना दोन महिन्यातील नसून याच्याशी आमच्या सरकाचा काही संबंध नाही, असे म्हणत हात झटकले आहेत. यावरून विरोधकांनी टीकेची धार अजून टोकदार केली आहे. यामुळे राज्याच राजकारणं चांगलच तापलं आहे. (Central State Railway Minister Raosaheb Danve News)

Central State Railway Minister Raosaheb Danve News
रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला मग महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहीहंड्या फोडायच्या का ?

रावसाहेब दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक उद्योजक यायला तयार असतात. त्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा द्यायला हव्यात. मात्र मागच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. ही घटना दोन महिन्यातील नसून याच्याशी आमच्या सरकाचा काही संबंध नाही. महाराष्ट्राचे प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आजुबाजूच्या राज्यात गेले आहेत, अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

पुढे दानवे म्हणाले की, महाराष्ट्राला तोडणारा या देशात जन्माला यायचा आहे. पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला असल्याची आपल्याला काही माहिती नाही. तसेच शिर्डी विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीवर बोलतांन ते म्हणाले की, कोर्टाने देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त केलं आहे. ते सरकारने केलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या हिंदू गर्जना सभेच्या संदर्भात संपुर्ण दौरा आला तर मी बोलेल, असेही त्यांनी सांगितले.

Central State Railway Minister Raosaheb Danve News
Bacchu Kadu : राजकीय आंदोलन भोवलं : बच्चू कडू यांचा मुक्काम आता कारागृहात

दरम्यान, प्रकल्प हा गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. याबाबत अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60 : 40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. याप्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता. हा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा करण्यात आली होती, मात्र हा प्रकल्प आता गुजरातला जात आहे. याबाबत आपण प्रयत्न करावे आणि राज्यात परत आणावा, अशी मागणी केली होती.

Central State Railway Minister Raosaheb Danve News
'वेदांता' प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? सखोल चौकशीची राज ठाकरेंनी केली मागणी

कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर ट्विटरच्या मार्फत टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यांनी थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले? याचा खुलासा सरकारने करावा. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. याचे गांभीर्य या सरकारला नाही. १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला आणि महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का? अशा शब्दात थोरातांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in