Sada sarvankar | हवेत गोळीबार करणं भोवलं; सरवणकर पितापुत्रांना पोलिसांकडून समन्स

Sada sarvankar | आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे
Sada sarvankar
Sada sarvankar

मुंबई : प्रभादेवी परिसरातील राडा आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच गोळीबार प्रकरणी शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार सदा सरवणकर व त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना दादर पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. पोलिसांकडून आमदार पिता, पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी सरवणकर यांच्यावर आर्म्स अॅक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. तसेचया प्रकरणास सदा सरवणकर यांचे पिस्तुलही पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Sada sarvankar
Thackeray vs. Shinde : ठाकरे - शिंदे गटात हाणामारी ; आमदार सरवणकरांनी गोळीबार केला ?

काय आहे प्रकरण?

राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (ganesh visarjan2022) पार पडली. पण प्रभादेवी येथील मिरवणुकीच्या वादाचे पडसाद शनिवारी रात्री उमटले. प्रभादेवी (prabhadevi) परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली.

या प्रकऱणी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले. तसेच, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे.

शनिवारी सकाळी प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले.यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची रस्त्यावर हाणामारी झाली, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी दावे-प्रतिदावे केले आहे. आमदार सरवणकरांनी आरोप फेटाळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com