Cyrus Mistry यांच्या अपघाती मृत्यूनंतर महिंद्रा यांनी टि्वट करुन केली ही विनंती

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत काही गोष्टी समोर येत आहेत. त्यांचे प्राण वाचू शकले, याचीही चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहे.
anand mahindra, Cyrus Mistry
anand mahindra, Cyrus Mistrysarkarnama

मुंबई : उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे काल (4 सप्टेंबर) अपघाती निधन झाले. या अपघातानंतर सर्वच क्षेत्रातून भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहनचालकांना एक विनंती केली आहे.

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत काही गोष्टी समोर येत आहेत. त्यांचे प्राण वाचू शकले, याचीही चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहे. त्यांनी सीटबेल्ट लावला असता ते वाचू शकले असते,असे मत व्यक्त करण्यात येत आहे. कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेले बहुतांश ड्रायव्हर आणि प्रवासी सीट बेल्ट लावतात, मात्र मागे बसलेले प्रवासी बेल्ट लावणे आवश्यक मानत नाहीत. याबाबत आनंद महिंद्रा यांनी टि्वट करीत वाहनचालकांना आवाहन केले आहे.

आनंद महिंद्रा नेहमी कारच्या मागच्या सीटवर बसले असले तरी सीट बेल्ट लावतात. हा संकल्प सर्वांनी करावा, असं आवाहनही महिंद्रा यांनी केले आहे. "मी नेहमी माझा सीट बेल्ट गाडीच्या मागील सीटवर देखील घालतो आणि मी तुम्हा सर्वांना सीट बेल्ट वापरण्याची विनंती करतो," असे आनंद महिंद्रा यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

anand mahindra, Cyrus Mistry
शेलारांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर ; मराठी शाळा बंद कुणी केल्या, वाझेला वसुलीला कुणी बसवले ?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या चारोटी येथे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा काल (रविवारी) अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या वाहनचालक महिला डॉक्टरची अतिघाई तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न झाल्याने हा अपघात झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

सायरस मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला येत असताना सूर्या नदीवरील पुलावर चारोटी टोलनाक्याजवळ त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि त्यात त्यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याची सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार याची चौकशी करण्यात आली असता, काही धक्कादायक तथ्ये समोर आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली.

कोण होते सायरस मिस्त्री..

  1. सायरस मिस्त्री हे देशातील एक ख्यातनाम व्यापारी आणि उद्योगपती होते, जे एका ट्रिलियनेअर कुटुंबातील होते.

  2. ते रिअल इस्टेट व्यावसायिक पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. पालोनजी शापूरजी यांना एकूण चार मुले आहेत.

  3. सायरस मिस्त्री यांच्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मोठ्या भावाचे नाव शापूर आणि बहिणींचे नाव लैला आणि अल्लू आहे.

  4. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला आहे. ते रतन टाटा यांचे नातेवाईकही आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com