Cyrus Mistry : अपघातात सायरस मिस्त्रींचे निधन, फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Cyrus Mistry car accident : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन
Cyrus Mistry car accident
Cyrus Mistry car accidentsarkarnama

Cyrus Mistry car accident : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे कार अपघातात निधन झाले. पालघर येथे त्यांच्या गाडीला मोठा अपघातात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पालघर जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे.

यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले. फडणवीस म्हणाले, 'प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग व आर्थिक जगताची मोठी हानी झाली. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते.

विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति! पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली आहे. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Cyrus Mistry car accident
देश टिकवायचा असेल तर...; राहुल गांधींचे विरोधी पक्षांना मोठे आवाहन

दरम्यान, मिस्त्री अहमदाबादहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. मिस्त्री यांच्यासोबत इतर चार जण प्रवास करत होते. त्यातील एकाचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिस्त्री हे मर्सिडिजने प्रवास करीत होते. पालघरजवळ सूर्या नदीवर असलेल्या चारटोली येथे त्यांची कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात घटनास्थळीच मिस्त्री आणि एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com