Aaditya Thackeray यांच्या नावाने खेळाडूला गंडा घालण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

Aaditya Thackeray : हॅलो, हाय ब्रो" असा मेसेज दीपेशला आला. दीपेशने रिप्लाय देताच "मी आदित्य ठाकरे, तू मला ओळखलं नाहीस का दीपेश?" असा प्रश्न संबधिताने विचारला.
Aaditya Thakre
Aaditya ThakreSarkarnama

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव वापरुन आरोपीने दादरच्या एका तरुणाकडे आर्थिक मदत मागितल्याचं उघडकीस आलं आहे. (Aaditya Thackeray latest news)

एका आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळलेल्या व्यक्तीला अनोळखी नंबर वरून आदित्य ठाकरे असल्याचे भासवत पैसे उकळण्याच्या प्रयत्ना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपेश जांबळे या कुस्तीपटूने दादर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.वरळी कोळीवाडा येथील 24 वर्षीय दिपेश जांभळे या कुस्तीपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. दरम्यान त्याचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या हस्ते सन्मान देखील झाला आहे. दिपेश हा युवासेनेचा देखील शिलेदार आहे.

दीपेश जांबळे याला २३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. व्हॉट्सअॅप स्टेटसवरील डिस्प्ले पिक्चरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा फोटो होता, असं दीपेशने तक्रारीत म्हटलं आहे.

Aaditya Thakre
Shiv Sena : आदित्य ठाकरेंसाठी वीज चोरी ; चौकशी सुरु, व्हिडीओ व्हायरल

आपण आदित्य ठाकरे असल्याचं भासवणार्‍या व्यक्तीने त्याला मेसेज करून आपल्याला मित्राला काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करायची आहे. मात्र नेट बॅंकिंग काम करत नसल्याने 25 हजार रूपये ट्रान्स्फर करण्याची विनंती केली. हा व्यवहार पेटीएम द्वारा करण्याचं आणि दुसर्‍या दिवशी पैसे परत दिले जातील असेही नमूद केले होते.

हॅलो, हाय ब्रो" असा मेसेज दीपेशला आला. दीपेशने रिप्लाय देताच "मी आदित्य ठाकरे, तू मला ओळखलं नाहीस का दीपेश?" असा प्रश्न संबधिताने विचारला. मी ओळखलं, पण सरांनी मेसेज केल्यामुळे मी गोंधळलो, अशी थाप दीपेशने ठोकली.

दिपेशला हा प्रकार संशयास्पद वाटला त्याने युवासेनेचा पदाधिकारी सुरज चव्हाणला सारा प्रकार सांगितला. त्याने दादर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणी कलम 417, 419, 511, 66 (C), 66 (D) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या पोलिस या मोबाईल क्रमांकावरून झालेले कॉल्स, इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटी द्वारा आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com