Currency : भारतीय नोटांवर पंतप्रधान मोदींचाही फोटो असावा : भाजप आमदाराची मागणी!

Currency : मोदींचे निरंतर मेहनत आपण कसे नाकारू शकतो? भारताला महान बनवण्याचे मोदीजींचे प्रयत्न संपूर्ण जग लक्षात ठेवेल.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

मुंबई : भारतीय चलनी नोटांवर आता विविध फोटो लावा अशी मागणी होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच आता हिंदू देवतांचे फोटो लावा अशी मागणी केली होती. देवी लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो चलनी नोटांवर असावे, अशी मागणी पंतरप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांनी केली. आता भाजप नेते आणि प्रवक्ते राम कदम यांनी अजबच मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो असावा, या आशयाचे ट्विट कदम यांनी केले आहे.

Narendra Modi
Kishori Pednekar : सरडा पण लाजेल इतक्या भूमिका राज ठाकरे बदलतात ; पेडणेकरांची बोचरी टीका!

मोदींचे निरंतर मेहनत आपण कसा नाकारू शकतो? भारताला महान बनवण्याचे मोदीजींचे प्रयत्न फक्त देशच नाही तर संपूर्ण जग लक्षात ठेवेल.अखंड भारत,न्यू इंडिया, ग्रेट इंडिया, जय श्री राम, जय मातादी," अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.

Narendra Modi
Aditya Thackeray : शिंदे-फडणवीस आणि आदित्य ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर!

यासोबतच त्यांनी शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नरेंद्र मोदी यांचे भारतीय चलनी नोटांचे चित्रेसुद्धा त्यांनी पोस्ट केले आहेत. एकूणच विविध नेत्यांकडून भारतीय चलनावर विविध देव देवाता आणि महापुरूषांचे फोटो लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in