मुंबईत संचारबंदी! अमरावती हिंसाचार आणि ओमिक्रॉनमुळे निर्बंध कठोर

आज मध्यरात्री पासून 12 डिसेंबरपर्यंत (४८ तास) संचारबंदी (कलम १४४) लागू
mumbai curfew
mumbai curfew

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज मध्यरात्री पासून 12 डिसेंबरपर्यंत (४८ तास) संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार आजपासून मुंबई शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, रॅली किंवा आंदोलनांना सक्तीने मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या संदर्भातील आदेश ही जारी केले आहेत. त्रिपुरा (Tripura) हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात अमरावती (Amarawati), मालेगाव (Malegaon) यांसह ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित्त एआयएमआयएम पक्षाकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत कोरोना निर्बंधांचे पालन करत ही मुस्लिम आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातील वक्फ संपत्तीचे संरक्षण व्हावे, या मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. आज संध्याकाळपर्यंत ही रॅली मुंबईत दाखल होईल, त्यानंतर आयोजित एका सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी संबोधित करतील, अशी रॅलीची रुपरेषा होती. मात्र आता निर्बंध लागू केल्यानंतर एमआयएम यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

mumbai curfew
नारायण राणेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे शिवसेना-भाजप वादाची ठिणगी

दरम्यान, गेल्या महिन्यात त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती-नांदेड, मालेगावसह अन्य ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शने करण्यात आली. परंतू या निदर्शनांना हिंसक वळण लागले. अनेकांना पोलिसांनी अटकही केली. त्यानंतर बरेच दिवस अमरावतीत संचारबंदी आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

याशिवाय, राज्यातील कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे वाढते रुग्ण पाहता मुंबईत निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकारामुळे निर्माण झालेला धोका तसेच अमरावती, मालेगाव आणि नांदेड येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही अंमलबजावणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये ओमिक्रॉनच्या सात प्रकरणांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ओमिक्रॉन संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या आता 17 वर पोहचली आहे. गुरुवारी सायंकाळपासून राज्यात आणखी 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर राज्यात कोरोना संसर्गाची संख्या ६६,४२,३७२ वर पोहचली आहे. तर आता पर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या १,४१,२२३ वर गेली आहे, असे विभागाने सांगितले. त्याच वेळी, 64,90,936 लोक संसर्गातून बरे झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com