मिसळ खाताना संजय राऊतांना विरोधकांची आठवण... त्यांनाही चटका आणि झटका देणार

हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्र मध्ये आहेत.
मिसळ खाताना संजय राऊतांना विरोधकांची आठवण... त्यांनाही चटका आणि झटका देणार
Sanjay Rautsarkarnama

डोंबिवली : मिसळ ही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आहे. मिसळ मध्ये एक झटका आहे. हा स्वाभिमानाचा झटका उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे. हा झटका आणि चटका आपल्याला महाराष्ट्रात अनेकांना द्यावा लागणार आहे, असा झणझणीत टोला शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि भाजपला (Bjp) लगावला. डोंबिवलीत आयोजित मिसळ मोहोत्सवात शनिवारी राऊत यांनी उपस्थिती लावली होती.

भाऊ चौधरी फाऊंडेशनचे अभिषेक चौधरी, श्री आराध्या ग्रुप आणि शिवसेना यांच्यावतीने डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला राऊत यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाऊ चौधरी, गोपाळ लांडगे, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sanjay Raut
हिंदुत्वाच्या लढाईत आता बालाजी शिवसेनेला पावणार का?

राऊत यावेळी म्हणाले, म्हणाले, मिसळ ही चवदार आहे ती आपली संस्कृती आहे. मात्र, ज्या प्रकारे आज राजकारण सुरू आहे ती आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात सत्ताधारी, विरोधक, विविध विचारांच्या पक्षाचे लोक ही एकमेकांच्या विरुद्ध टीका करत राहिले. पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुडाचे, द्वेषाचे व कंबरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच नव्हते. या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार आणि शिवसेनाप्रमुखांमध्ये कितीतरी वाद झाले. मात्र, ज्या पध्दतीने राजकारण भाजपने गेल्या दोन चार वर्षात सुरू केले आहे, ते राज्य आणि देशाला परवडणारे नाही.

हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्र मध्ये आहेत. एका ओवेसीला उत्तर प्रदेशमध्ये ज्यापद्धतीने वापरण्यात आले, निवडणुका जिंकण्यासाठी, त्याचपद्धतीने नवे हिंदू ओवेसींना महाराष्ट्रामध्ये शिवसेना याच्याविरुद्ध लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

औरंगाबाद येथे मनसेची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने शहरात बॅनर लागले असून राज यांना हिंदुहृदयसम्राट संबोधले गेले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, किती नकला केल्या शिवसेना प्रमुखांच्या तरी शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट एकच.

Sanjay Raut
पारकरांनी ओळख करून देताच राज माझ्या मागावर : शर्मिला ठाकरेंनी सांगितला तो किस्सा!

या वेळी राऊत यांनी महोत्सवात मिसळचा आस्वाद घेतला. दोन वर्षांनी सगळे एकत्र आलो, तोंडावर मास्क नाही आणि तोंड चालू आहे. हे असेच वातावरण राहायला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली हे संकट आपण पार केल असले तरी खबरदारी घ्यायची गरज आहे. खाते रहो असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डोंबिवलीकरांनी या महोत्सवात दुसऱ्या दिवशीही गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, कल्याण नाशिक, ठाणे, पारनेर, कोकणातील मिसळीची चव खवय्यांना चाखायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.