चव्हाणांनी, शिंदेंवर सोडलेल्या बाणाचा भेद करण्यासाठी भाजप नेते मैदानात

अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका केली
Ashok Chavan, Eknath Shinde
Ashok Chavan, Eknath Shindesarkarnama

Ashok Chavan : मुंबई : काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. एकनाथ शिंदे यांचा त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. चव्हाण शिंदे यांच्या बाबत बोलले असले तरी त्यांच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. अशोक चव्हाणांनी एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचे नाव घ्यायला हवे होते, असे ते म्हणाले. अशोक चव्हाण आता एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता अशोकरावांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले पाहिजे. अन् सांगितले पाहिजे की, उद्धव ठाकरे आमच्याकडे कॉंग्रेसचे सरकार बनवण्यासाठी आले होते. या लोकांना पाठवले होते, असे त्यांनी म्हणायला हवे होते. मात्र, त्यांनी वाक्य उलटे म्हटले, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Ashok Chavan, Eknath Shinde
रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांची घरी जाऊन घेतली कुटुंबीयांची भेट!

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर अशोक चव्हाण यांना थेट इशाराच दिला. अशोक चव्हाणांची क्लिप आम्ही जाहीर केली, तर त्यांची फार अडचण होईल. ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही. काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात. त्या प्रथा, परंपरांचा आम्ही भंग करू इच्छित नाही. चव्हाणांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणार नाही. मात्र, त्यांच्या राजकीय बाबींवर आम्ही बोलू शकतो, अशा शब्दांत शेलारांनी चव्हाणांना इशारा दिला.

Ashok Chavan, Eknath Shinde
Bjp : चारशे खासदार अन् पुन्हा मोदी पंतप्रधान मिशनसाठी भाजप सज्ज..

इतर भाजप नेत्यांनीही चव्हाण यांच्यावर टीका करत शिंदे यांची बाजू घेतली आहे. शिवसेनेमध्ये बंड करुन शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. दरम्यान, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या 'एकनाथ शिंदे हे १५ ते १६ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com