सदावर्तेंना चार महिने आधीच लगाम घातला असता तर संप इतका चिघळला नसता!

पैसे मोजण्याची मशीन घरात ठेवावी असा कोणता धंदा या महाशयांनी सुरू केला होता?
Sanjay Raut Latest News Updates,  Gunaratna Sadavarte Latest News, Samana Article on Gunaratna Sadavarte
Sanjay Raut Latest News Updates, Gunaratna Sadavarte Latest News, Samana Article on Gunaratna SadavarteSarkarnama

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे अटकेत आहेत.त्यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे.त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. काल त्यांच्या घरातून पैसे मोजण्याची मशीन जप्त करण्यात आली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भाष्य करण्यात आले आहे. (Gunaratna Sadavarte Latest News)

सदावर्ते यांच्या घरी एक पैसे मोजायचं मशीन सापडलं आहे.काल न्यायालयात बोलताना त्यांनी आपण कर्मचार्‍यांकडून 200,300 रूपये घेतल्याचं म्हटलं आहे. 48,000 एसटी कर्मचारी आपले क्लायंट आहेत. इतके कमी पैसे कोणता वकील घेतो? असा सवाल त्यांनी आपली बाजू मांडताना केला आहे. तसेच काही संशयास्पद वस्तू सापडल्यानेही सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Sanjay Raut Latest News Updates,  Gunaratna Sadavarte Latest News, Samana Article on Gunaratna Sadavarte
मेट्रोच्या तोट्याची जबाबदारी भाजप नेते घेतील का ? ; राष्ट्रवादीचा सवाल

''पैसे मोजण्याची मशीन घरात ठेवावी असा कोणता धंदा या महाशयांनी सुरू केला होता? वकिलीतून इतका पैसा मिळावा की,ते मोजायला यंत्र लागावे? एस.टी. कामगारांना उल्लू बनवून जमा केलेल्या पैशांची मोजदाद करायला ही मशीन सदावर्तेकडे होती,''असे अग्रलेखात म्हटलं आहे.

''सदावर्तेने संपकाळात काही मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या. सदावर्ते ज्या परळ भागातील इमारतीत राहत होता ती जागादेखील संशयास्पद व्यवहारातून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सदावर्ते व त्याची बायको हे इमारतीमधील इतर अधिकृत रहिवाशांना सतत धमक्या देत होते. कोणी प्रतिवाद केला तर ‘ऍट्रॉसिटी’ गुन्ह्यांत अडकवू अशी भीती दाखवत होते,'' असा आरोप अग्रलेखातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut Latest News Updates,  Gunaratna Sadavarte Latest News, Samana Article on Gunaratna Sadavarte
राष्ट्रवादीच्या आमदाराचे पक्षश्रेष्ठींनाच अल्टीमेटम ; वागणं सुधारा, अन्यथा वेगळा निर्णय घेणार

''गुणरत्न सदावर्तेच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. सदावर्ते व त्याच्या माफिया टोळीने एस. टी. कामगारांकडून कोटय़वधी रुपये गोळा केले. कामगारांना देशोधडीस लावून स्वतःचे खिसे भरणारे सदावर्तेसारखे पुढारी म्हणजे माणुसकीचे शत्रूच आहेत,'' असे राऊतांनी म्हटलं आहे.

अनेक जिल्ह्यांत सदावर्तेयांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या महाशयांची गावभर वरात काढली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की,सदावर्तेची वरात निघाल्यापासून एस. टी. वेगात सुरू झाली आहे व आतापर्यंत 75 हजार एस.टी. कर्मचारी डयुटीवर रुजू झाले आहेत.गुणरत्न सदावर्ते त्यांच्याच कर्माची फळे भोगत तुरुंगात पडले आहे.सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर एस.टी. संप इतका चिघळला नसता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गुणरत्न यांनी परळ आणि भायखळा मध्ये मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे. संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं आहे. तर गुणरत्ने यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करताना त्याच्याबद्दल कोणाचीही तक्रार नमूद नाही मग पोलिस कोठडीची गरज काय? सध्या घरामध्ये केवळ त्यांची लेक असून ती पोलिसांना सहकार्य करत असल्याचं म्हटलं आहे. तर जागा आधीच घेतलेली आहे आणि कार मी घेऊ शकत नाही का? असा सवाल विचारत आर्थिक व्यवहारांबद्दलचे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.

गिरगाव न्यायालयात काल पोलिस कोठडीमध्ये वाढ झाली असली तरीही सातारा न्यायालयात त्यांना आक्षेपार्ह वक्तव्याच्या दुसर्‍या प्रकरणामध्ये दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com