राजकीय पक्षांकडून परप्रांतीय मतदारांसाठी पायघड्या!

राजकीय पक्षांची मतदारांना आकर्षित करण्याची खेळी?
Dombivli Municipal Elections
Dombivli Municipal Electionssarkarnama

डोंबिवली : निवडणुकीच्या (Elections) तोंडावर परप्रांतिय, भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष काही ना काही क्लृप्त्या लढवित असतात. डोंबिवली (Dombivli) जवळील उसरघर गावात एका राजकीय पक्षाच्या सहाय्याने उत्तर भारतीयांसाठी क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्यांत केवळ उत्तर भारतीय खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले. यापूर्वीही गुजराती भाषकांना आकर्षित करण्यासाठी डोंबिवलीत कच्छ, मारवाडी तरुणांसाठी क्रिकेट सामने आयोजित केले गेले होते. येथील नवनित नगर मधील एका इमारतीला तर चक्क गुजराती भाषेत नाव दिल्याची घटना घडली होती.

नागरिकांच्या विरोधानंतर येथील रहिवाशांनी मराठी भाषेत इमारतीचे नाव लिहित मराठीला प्राधान्य दिले होते. मराठीला प्राधान्य देण्याऐवजी राजकीय व्यक्ती मतांसाठी इतर भाषिकांना प्राधान्य देत असल्यानेच त्यांचे वर्चस्व वाढवत असल्याची ओरड मराठी भाषकांकडून होत आहे. उसरघर गावात किंग्स ग्राऊंडवर उत्तर भारतीय लीगचे आयोजन करण्यात आले होते. एका राजकीय पक्षाने या मॅचसाठी सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. या मॅचचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Dombivli Municipal Elections
शरद पवारांच्या खेळीने उद्धव ठाकरेंचा डाव गुंडाळणार?

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वहात असून निवडणुकांच्या आधीची तयारी राजकीय पक्षांची सुरु आहे. प्रभागांतील उमेदवार कार्यकर्ते यांना पक्षात खेचण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडली जात नाही आहे. सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरु असून मुलांसाठी क्रिकेट मॅच, फुटबॉल मॅच यांसारख्या लीगचे आयोजन पक्षांकडून केले जात आहे. उसरघर येथे चक्क उत्तर भारतीय खेळाडूंसाठी क्रिकेट सामने आयोजित करत या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला.

सांस्कृतिक नगरी, मराठी चाकरमान्यांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरात यापूर्वी नवनीत नगर येथील एका इमारतीचे नाव गुजराती भाषेत लिहिण्यात आले होते. त्याला अनेकांनी विरोध केल्यानंतर मराठी भाषिकांनी इमारतीचे नाव मराठीत लिहिण्याची मागणी केल्यानंतर ते नाव मराठी भाषेत लिहिण्यात आले. तसेच गुजराती, कच्छ, मारवाडी तरुणांसाठी क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. मांसाहार खाणाऱ्यांना इमारतीत घर न देणे, मांसाहार खाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती असे प्रकारही घडून लागले आहेत.

Dombivli Municipal Elections
संभाजीराजेंना महाराष्ट्रातील 'या' अपक्ष आमदाराने जाहीर केला पहिला पाठिंबा

कोरोनाचा (Corona) प्रभाव कमी होऊनही यंदाच्या मराठी बांधवांचा सण नववर्षाचे स्वागत, डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेवर बंधने घातली गेली. त्याविरोधात कोणी आवाज उठविला नाही. मात्र, परप्रांतियांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे फोटो व्हायरल झाल्याने मुळ डोंबिवलीकर मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठीच अशा टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. राजकीय पक्ष मराठी भाषेचे वर्चस्व वाढविण्याऐवजी परप्रांतियांचे वर्चस्व वाढवित असल्याची ओरड व संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in