गणेश नाईकांच्या डीएनए चाचणीबद्दल न्यायालयाने आदेश द्यावेत : पीडित महिला करणार विनंती

गणेश नाईक यांच्या अटकेबद्दल कोर्टाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
Ganesh Naik
Ganesh Naik Sarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या विरोधात पीडित महिला उद्या (ता. १ मे) न्यायालयात जाणार आहे. नाईक यांच्यापासून असलेला मुलगा आणि तिला योग्य तो न्याय मिळण्याच्या दृष्टीने गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करण्याबद्दलचे योग्य ते आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती ती महिला उद्या न्यायालयात करणार आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सांगितली. (Court should issue order regarding DNA test of Ganesh Naik : Victim woman will make a request)

गणेश नाईक हे माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. त्यांच्यापासून आपल्याला एक मुलगा आहे. त्याला गणेश नाईक यांनी आपले नाव द्यावे, अशी मागणी करणार अर्ज संबंधित महिलेने राज्याच्या महिला आयोगाकडे केली हेाती. तसेच, नाईक आणि त्यांचे मुलगे हे आपल्याला धमकावत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचे अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे नाईकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Ganesh Naik
येत्या चार मेनंतर मी कुणाचेही ऐकणार नाही; अभी नही; तो कभी नही : राज ठाकरे आक्रमक!

दरम्यान, संबंधित असलेल्या महिलेने आज तिच्यावर होत असलेल्या अन्याय आणि धमक्याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. तसेच, आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर गोऱ्हे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

Ganesh Naik
आरआर आबा, विजयदादा, जयंतराव अन्‌ मला या कारणांमुळे ‘ग्रामविकास’ला चांगल्या योजना देता आल्या!

संबंधित महिलेला आणि नाईक यांच्यापासून असलेल्या मुलाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करण्याबद्दलचे योग्य ते आदेश कोर्टाने द्यावेत, अशी विनंती त्या उद्या कोर्टामध्ये करणार आहेत. तसेच, गणेश नाईक यांच्या अटकेबद्दल कोर्टाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा. नाईक या महिलेल्या सातत्याने देत असलेल्या धमक्या आणि त्रासापासून कोर्टाने संरक्षण द्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com