रुग्णालयात दाखल असल्यानं देशमुख तूर्त सुटले पण वाझे, पलांडे, शिंदे अडकले!

शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशमुखांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मागील वर्षी 2 नोव्हेंबरला अटक केली होती. आता देशमुख वगळता बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि सचिव कुंदन शिंदे यांचा ताबा आता केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) मिळाला आहे. त्यांची 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

वाझे, पलांडे, शिंदे यांना सीबीआयने अटक केली आहे. शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. देशमुख हे रुग्णालयात असल्याने त्यांची अटक तूर्तास टळली आहे. याबाबत सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने या तिघांचा ताबा सीबीआयला दिला आहे. याच गुन्ह्यात आरोपींच्या चौकशी करता यावी यासाठी सीबीआयने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आरोपींचा ताबा सीबीआयला देण्यात आला असून. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांचीही 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

Anil Deshmukh
पेट्रोल महागलं अन् मग चक्क घोड्यावरूनच सुरू झाली वीजबिल वसुली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर ईडी व सीबीआयने देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीने त्यांना करचुकवेगिरी प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांना आज रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Anil Deshmukh
पंजाबनंतर आणखी एका राज्यात 'आप' देणार धक्का; बडा नेता लागला गळाला!

करचुकवेगिरी प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून आरोपपत्र दाखल केल्याने डिफॉल्ट जामीन मंजूर करावा, अशी मागणी देशमुखांनी नुकतीच विशेष न्यायालयाकडे केली होती. ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. ईडीने या अर्जाला जोरदार विरोध केला होता. साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड केली जाण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली होती. न्यायालयाने देशमुखांची मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान, देशमुख हे गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यावेळी तब्बल 12 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात आहेत. कर चुकवेगिरी प्रकरणातही देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com