न्यायालयाने भाजप नेत्याच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मंत्री नवाब मलिक यांनी नोव्हेंबर महिन्यात हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान बांग्लादेशी असल्याचा आरोप केला होता.
Haidar Azam

Haidar Azam

भाजप नेते हैदर आझम (Haidar Azam) यांची पत्नी रेश्मा खान (Reshma Khan) हिचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. रेश्मा खान यांनी बांगलादेशी नागरिक असताना बोगस कागदपत्रं वापरून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोपानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर रेश्मा खानच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हैदर आझम (Haidar Azam) यांनी मात्र आपली पत्नी बिहारमधील (Bihar) नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर गावातील रहिवासी असल्याचा दावा केला होता. खान यांच्यावर बांगलादेशी नागरिक असताना बोगस कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p><strong>Haidar Azam</strong></p></div>
निमित्त महापौर पदाच्या निवडणुकीचं; काँग्रेसला मिळणार नवा राजकीय भिडू

रेश्मा खानच्या याचिकेवर निर्णय प्रलंबित असल्याने यापूर्वी रेश्मा खानला सत्र न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले होते. मात्र तक्रारदार निवृत्त पोलिस निरीक्षक दीपक कुरुळकरचे वकील नितीन सातपुते यांनी रेश्मा खानला दिलासा देण्यास विरोध केला होता. हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नोव्हेंबरमध्ये केला होता.

तसेच, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून माजी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी हे प्रकरण दडपल्याचा दावाही त्यांनी केला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुरुळकर यांच्या 16 सप्टेंबर 2020 च्या जबाबाचा दाखला देत नवाब मलिक यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समक्ष दिलेला पाच पानी जबाब मलिक यांनी उघड केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com