'party loyalty' scene
'party loyalty' sceneSarkarnama

‘ते’ चित्र हटवून पक्षनिष्ठा देखावा लावा; सेनेतील बंडखोरीवर भाष्य करणारा देखावा लावण्यास कोर्टाची परवानगी

या देखाव्यावर आक्षेप घेऊन कल्याण पोलिसांनी संपूर्ण देखावाच पहाटेच्या सुमारास जप्त केला हेाता, तसेच मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर चित्रमय टीका करणारा पक्षनिष्ठा हा देखावा लावण्यास कल्याणमधील (Kalyan) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटींसह परवानगी दिली आहे. ठाकरे (Thackeray) यांची छायाचित्रे लावल्यामुळे गुन्हा कसा होतो, असा प्रश्न पोलिसांना करतानाच देखावा संदेश देणारा असावा, कोणाला अवमानित करणारा नसावा, असेही न्यायालयाने मंडळाला सुनावले आहे. (Court permits 'party loyalty' scene riticizing Eknath Shinde)

'party loyalty' scene
मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही अन्‌ लोकसभाही लढणार नाही : फडणवीस

शिवसेनेमधील बंडखोरीवर कल्याणमधील विजय तरुण मंडळाकडून यंदाचा देखावा तयार करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे या देखाव्यामध्ये वापरण्यात आली आहेत. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचेही छायाचित्र या देखाव्यात आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी मिळतेजुळते एक छायाचित्र या देखाव्यामध्ये आहे. या देखाव्यावर आक्षेप घेऊन कल्याण पोलिसांनी संपूर्ण देखावाच पहाटेच्या सुमारास जप्त केला हेाता, तसेच मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे मंडळाने तातडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

'party loyalty' scene
राष्ट्रवादीत दोन नव्हे तर पन्नास गट; माझाही एक वेगळा गट : खडसेंचे गुलाबराव पाटलांना प्रत्युतर

गणेशोत्सवामुळे न्यायालयास सध्या सुटी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या दालनात सुनावणी घेतली होती. उद्धव ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे देखाव्यात लावण्यास आक्षेप का आहे, यामुळे कोणता गुन्हा होतो, असा सवाल खंडपीठाने पोलिसांना केला. तसेच, देखावे हे सामाजिक संदेश देण्यासाठी असतात, त्या देखाव्यातून कोणालाही अपमानित करण्यात येऊ नये, अशी समज न्यायालयाने मंडळाला दिली आहे. अमित शहा यांच्यासारखे दिसणारे छायाचित्र लावण्यात येऊ नये. मात्र, अन्य छायाचित्रे लावण्यासाठी परवानगी आहे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

'party loyalty' scene
Sangli News : एकनाथ शिंदे गट-शिवसेना वादात २५ वर्षांची परंपरा होणार खंडित?

कल्याणमधील विजय तरुण मंडळाने पक्षनिष्ठा या थीमवर देखावा उभारला आहे. या देखाव्यात शिवसेना एका भव्य वृक्षाच्या स्वरूपात दाखवण्यात आलेली आहे. या वृक्षाच्या काही फांद्या गळाल्या आहेत, तर काही झाडांची फळे घेत आहेत. त्यानंतरही वृक्ष भक्कम स्थितीत आहे, अशा स्वरुपाचा हा देखावा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com