राणा दाम्पत्य बाहेर येणार पण तीन अटींचं पालन करावं लागणार; अन्यथा जामीन रद्द होणार!

Navneet Rana | Ravi Rana : राणा दाम्पत्य १२ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार
Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi
Navneet Rana Ravi Rana Latest News in MarathiSarkarnama

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. मागील बारा दिवसांपासून राणा दाम्पत्य तुरुंगात आहेत. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. रवी राणा सध्या तळोजा कारागृहात तर नवनीत राणा भायखळा कारागृहामार्फत स्पॉंडिलायसिसच्या उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात आहेत. (Navneet Rana Ravi Rana Latest News)

न्यायालयाने दोघांनाही पन्नास हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्यात आला आहे. त्यांना २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयात त्यावर अखेरचा युक्तीवाद ३० एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवस त्यावरील निकाल लांबला. अखेर बुधवारी सकाळी न्यायालयाने निकालाचे वाचन केले. दोघांनाही जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi
मातोश्रीला आव्हान देणाऱ्या राणा दांपत्याचे घर अवैध बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेच्या रडारवर

मात्र हा जामीन देताना न्यायालयाने राणा दाम्पत्याला ३ अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या तीन अटींमध्ये पुन्हा अशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरु नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांंशी कोणत्याही प्रकारची छेडछा करु नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देवू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच या अटी आणि शर्तींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आज संध्याकाळ पर्यंत राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी न्यायालयात दोघांना जामीन न देण्याची जोरदार मागणी केली होती. राणांच्या वतीने त्यांच्या वकीलांनीही जामीनाची मागणी करत बेकायदेशीरपणे त्यांना अटक केल्याचे सांगितले. घरत यांनी सांगितले होते की, राणांविरोधात कलम गंभीर आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यांना जामीन झाला तर दबाव येऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi
राहुल गांधीचा हार्दिक पटेलांना 'खास' मेसेज; पण नाराजी दूर होणार का?

रवी राणा यांच्याविरोधात १७ आणि नवनीत राणा यांच्याविरोधा ६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. बोरीवली येथून त्यांनी खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला होता. पण न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून दोघांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com