पुन्हा चिंता वाढली, लहान मुलांना होतेय कोरोनाची लागण

लहान मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination) केंद्राकडे (Central Government) मागणी करण्यात आली आहे.
पुन्हा चिंता वाढली, लहान मुलांना होतेय कोरोनाची लागण
COVID19 vaccineSarkarnama

पुणे : कोरोना (Covid -19) प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यापासून नियंत्रणात आल्याचे बघायला मिळाले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव हा पुन्हा हळूहळू डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 20 दिवसामध्ये राज्यातील लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 11 ते 20 वयोगटातील एक हजारापेक्षा जास्त मुलांना गेल्या 20 दिवसांत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबात जास्त काळजी करण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

 COVID19 vaccine
बच्चू कडू संतापले, `अरे, तुम्ही तर मंत्री जयंत पाटील यांच्या पत्रालाही दाद देत नाही`

याबाबत फारशी काळजी करण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात जरी येत असले तरी, यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लहान मुलांना कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांच्या लसीकरणासाठी केंद्राकडे मागणी केली असल्याची माहिती दिली आहे.

जगातील अनेक देशात 11 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. मात्र, अद्यापही आपल्या देशात या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आलेले नाही. यामुळे या वयोगटातील मुलांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार हा वृद्धांपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या वयोगटातील मुलांना लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी राज्याने केंद्राकडे लहान मुलांच्या लसीकरणाचा आग्रह धरला आहे.

 COVID19 vaccine
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

याबाबत टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावे मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. अनेक महिन्यापासून लहान मुले शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुनच शाळा सुरु करण्यात याव्या असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in