Ajit Pawar on Corona : कोरोना वाढतोय पण सरकार गंभीर नाही; अजित पवारांची टीका

Maharashtra Corona : राज्यात साडेचार हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

State Government and Corona : महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काही रुग्णांचा मृत्यूही होत आहे. याबाबत मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकही कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कुणीही मास्क वापरणे व इतर खबदारी घेताना दिसत नाही. ही चिंताजनक बाब असून याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar
BJP- NCP Politics: सावरकर गौरव यात्रेला राष्ट्रवादीचे उत्तर; फुले-आंबेडकर जयंती दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र याला कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. या गोष्टीचे गांभीर्य लोकांना पटवून देण्यासाठी सरकारने सर्व सरकारी कार्यालयात मास्क सक्ती करणे गरजेचे आहे. मात्र असे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये कोरोना संक्रमणाचे गांभीर्य राहिलेले नाही. राज्य सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घ्यावा. नागरिकांना त्याचे गांभीर्य सांगावे. यातून जनतेला वस्तूस्थिती समजेल."

Ajit Pawar
Ashish Deshmukh Join Ncp : काँग्रेसमधील कोंडीमुळे आशिष देशमुख घड्याळाचा हात धरणार?

कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सर्वांना बरोबर घ्यावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केल. अजित पवार म्हणाले, "राज्य सरकारने कोरोना विषयाबाबत संपूर्ण सभागृहाला विश्वासात घ्यावे. संसर्ग रोखण्यासाठी काय योजना असेल ती सर्वांना समजावून सांगावी. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागतील. तसेच काही स्वयंसेवी संस्थाचीही मदत घेणे गरजेचे आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात सर्वांशी समन्वय साधला गेला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या संपर्कात होते."

Ajit Pawar
BJP-NCP Politics: निष्क्रियतेचा भोपळा फुटला म्हणणाऱ्या मुळीकांनी आमदारकी फुकट घालवली; टिंगरेंचा हल्लाबोल !

कोरोनाबाबत राज्य सकरकार गंभीर नसल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, "राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचे सरकारला गांभीर्य नाही. त्यांनी सरकरी कार्यलयाला कोणतेही आदेश दिलेले नाहीत.त्यामुळे कुणीही मास्क वापरताना दिसत नाही. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहेत. त्यामुळे सरकराने ही बाब गांभिर्याने घेऊन जनतेना दिलासा द्यावा."

दरम्यान, राज्यात तीन हजार ९८७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच गुरुवारी ८०३ नव्या रुग्णांची भर पडली.

(Edited by - Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com