महाराष्ट्रात अलर्ट; दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र सरकारनेही प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Corona Virus
Corona VirusSarkarnama

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने जगभरात चिंता वाढवली आहे. अधिक वेगाने पसरणाऱ्या या विषाणुचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आला होता. त्यानंतर जगभरातील अन्य काही देशांतील नागरिकांना या विषाणुची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एक प्रवासीही पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारनेही (Maharashtra Government) प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

डोंबिवलीमध्ये आलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. जनुकीय तपासणीसाठी या रुग्णाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही आज चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका अलर्ट झाली आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आला होता.

Corona Virus
चांदीवाल समितीचा दणका अन् परमबीरसिंह हाजिर हो!

दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही प्रशासनाला अलर्ट केलं असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनची भीती सरकारनेही घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कोणीही कोरोना नियमांचा भंग केला तर दंड भरावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेनेही याअनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांची लसीकरण प्रमाणपत्रे किंवा आरटीपीसीआर चाचणी असली तरीही त्यांची पुनः तपासणी करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेऊन त्यापैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचा नमुना जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी पाठविला जाईल.

Corona Virus
शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या घरी आज लगीनघाई !

सर्व आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांना 15 दिवसांच्‍या प्रवासाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाईल. सर्व जंबो कोविड केंद्रांची पुन्हा तपासणी करण्यात येईल.

औषधांचा साठा, मनुष्यबळ, वैद्यकीय प्राणवायूचे उत्पादन व साठा, विद्युत आणि अग्निशमन यंत्रणा यांचा आढावा घेतला जाणार. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाईल. जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी करण्यात येईल. याचप्रमाणे या बैठकीत मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com