Suraj Chavan On Narwekar: राष्ट्रवादीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान; ''नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा करणं म्हणजे...''

Controversial Statement of NCP leader Suraj Chavan On Rahul Narwekar : ''भाजपच्या राजकीय डावपेचाला बळी पडू नका...''
Suraj Chavan On Rahul Narwekar
Suraj Chavan On Rahul Narwekar Sarkarnama

Mumbai News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर निकाल दिला. यात राज्यपालांच्या निर्णयावर ताशेरे ओढले तसेच प्रतोद म्हणून केलेली भरत गोगावलेंची नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली. पण शिंदे फडणवीस सरकारला अभय देत १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

यानंतर आता ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ९० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तर सत्ताधारी भाजपकडून विरोधक अध्यक्षांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Suraj Chavan On Rahul Narwekar
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : दंगल प्रकरणी नितेश राणे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण(Suraj Chavan) यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका करताना जीभ घसरली आहे. चव्हाण यांनी सोशल मीडियावरुन नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे. यावेळी ''राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा केल्यासारखं आहे'' असं वादग्रस्त विधान चव्हाण यांनी केलं आहे.

राज्यात छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नगरमधील शेवगाव यांसह विविध ठिकाणी दोन गटात हिंसाचाराच्या घटना घडल्या. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून सत्ताधारी भाजप या दंगली घडवत असल्याचा आरोप केला जात आहे.

Suraj Chavan On Rahul Narwekar
Chandrakant Patil News: किशोर आवारेंचे खूनी सुटणार नाहीत; चंद्रकांत पाटलांचा आवारे कुटुंबियांना शब्द !

याचवेळी आता राष्ट्रवादी(NCP)च्या सूरज चव्हाण त्यांनी भाजपाची महाराष्ट्रातील निवडणुकीची तयारी चालू झाली आहे.या वेळेचा पॅटर्न "दंगल" आहे. हिंदू मुस्लिम बांधवांनो, सावधान राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका. भाजपच्या राजकीय डावपेचाला बळी पडू नका असा हल्लाबोल भाजपवर केला आहे.

संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल...

संजय राऊत (Sanjay Raut)यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर कायद्याचे जाणकार आहेत. ते अनेक वर्ष शिवसेनेचेच वकील होते. शिवसेनेच्या माध्यमातूनच त्यांचे राजकारण पुढे गेले. त्यांना शिवसेना काय आहे हे माहिती आहे. काय घडले आहे, कसे घडवले, हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभे राहायचे असेल, तर त्यांनी त्यांची कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवावी अशी बोचरी टीका त्यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in